कार चालकाच्या डोक्यात हातोडा मारुन जबरी लूट; दोन आरोपी ताब्यात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कारमध्ये प्रवाशी म्हणून बसल्यानंतर त्यांनी चालकाच्या डोक्यात हातोडा मारुन जबरी चोरी केली (Ahmednagar) होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी (Police) चोवीस तासाच्या आत परराज्यातील दोन आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे.
जिल्ह्यात ही घटना घडली होती. या घटनेत कारमध्ये प्रवाशी म्हणून बसलेल्या दोन परप्रांतीय प्रवाशांनी गाडी चालकाच्या डोक्यात हातोडा मारून गाडीसह चालकाच्या खिशातील रोख रक्कम (Crime News) आणि मोबाईल घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी कार चालक सचिन बापु पठारे यांच्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोन्ही आरोपी ताब्यात
गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासात लावला. यात गाडी चोरून नेणारे शिवम मातादीन गौतम आणि दुर्जन अनारसिंग गौतम या दोघांसह चोरी गेलेला गाडीसह पाच लाखाच्या मुद्देमाल हस्तगत केला आहे.