महाराष्ट्र
30875
10
राजकीय पक्षांचा मराठा समाज उध्वस्त करण्याचा डाव -अंकुशराव डांभे
By Admin
राजकीय पक्षांचा मराठा समाज उध्वस्त करण्याचा डाव -अंकुशराव डांभे पाटील
पाथर्डी- प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला जो राजकीय पक्ष 50 टक्के ओबीसी मधून समावेशा साठी विरोध करून मराठ्यांना उध्वस्त करण्याचा प्रयत्न करेल,त्या पक्षाचे राज्यातील अस्तित्व संपवायचे काम मराठा समाज नक्कीच करेल.असा इशारा स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव डांभे पाटील यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे. त्यांनी पत्रकात म्हटले आहे की,आज महाराष्ट्रात गरीब मराठा समाज शिक्षण आणि नोकरी या आरक्षणासाठी मागणी करत आहे,मराठा समाजच आंदोलन सुरू झाल्याबरोबर ओबीसी समाज,धनगर बांधव,मुस्लिम बांधव,जागे झाले,हा राजकारणाचा भाग बनवला गेला जाती ,जातीत तेढ निर्माण करायचं, आंदोलने पेटवायची,आणि मराठा समाजाला आरक्षनापासून वंचित ठेवायचे,ही राज्यकर्त्यांनी निती आहे, शासनातील काही नेते ठराविक आंदोलनात सहभागी होतात, देवेंद्र फडणवीस आणि वडेट्टीवार ,भुजबळ यांची भूमिका निश्चित संशयास्पद आहे कारण त्यांना मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायचे नाही, या नेत्यांना मराठा समाजाची गरज नाही का? यावर त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. गर्भ श्रीमंत असलेले मराठा नेते स्वतः राजकीय फायद्यासाठी कधीच मराठा समाजातील गरीब वर्गाला आरक्षण मिळून देणार नाहीत सरकारने मराठा समाजाच्या आंदोलनावेळी एक महिन्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली,समाजाने वेळही दिला,परंतु सरकार एक महिन्यात सुद्धा सरसकट आरक्षण देण्याच्या तयारीत नाही.याची समाजाला जाणीव होत आहे. म्हणून प्रत्येक राजकीय पक्षात विखुरलेले गरीब मराठा कार्यकर्ते यांनी स्वतः ची उज्वल भविष्यासाठी एकत्र यावे,असे आवाहनही जिल्हाध्यक्ष अंकुशराव डांभे यांनी केले आहे, प्रसिद्धी पत्रकावर चंद्रकांत कराळे,योगेश गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष, महीला जिल्हाध्यक्षा मनिषा ताई निमसे, अमोल राजे म्हस्के,भाऊसाहेब भुसे गुरुजी,रमेश शेळके,निलेश काजळे,अनिल सुपेकर, सुदाम थोरे,देविदास ओंबळे, सुधीर नागवडे,निलेश दरेकर,बाबासाहेब कोरहाले, शरद नाना खांदे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Tags :
30875
10





