फुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित
By Admin
फुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याने पाथर्डी सपोनि व पोलिस कर्मचारी निलंबित
नगर सिटीझन live टिम-
पाथर्डी - तालुक्यातील टाकळीफाटा येथील माजी सैनिक मच्छिंद्र फुंदे खून प्रकरणात आरोपींना अटक करण्यात हलगर्जीपणा केेेल्याचा ठपक ठेवून पाथर्डी पोलिस ठाण्याचे सपोनि दिलीप राठोड व पोलिस कर्मचारी शिवनाथ बडे यांना निलंबित केले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
घटना घडल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड व पोलीस कर्मचारी बडे यांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याचे चौकशीत पुढे आले आहे. यांची जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित सपोनि राठोड व पोलिस कर्मचारी बडे यांना निलंबित करण्यात आले आहे.
तालुक्यातून जाणा-या कल्याणविशाखापटणम महामार्गावरील टाकळीफाटा येथे हॉटेलसमोर गाडी उभी करण्याच्या कारणातून माजी सैनिक मच्छिंद्र कारभारी फुंदे यांचा खून केल्या प्रकरणातील चौघा आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. सुधीर संभाजी सिरसाठ ( वय 26 रा. आसरानगर, पाथर्डी), आकाश पांडुरंग वारे (वय 24 रा. शिक्षककॉलनी पाथर्डी), आकाश मोहन डुकरे (वय 21 रा. विजयनगर पाथर्डी), गणेश सोन्याबापु जाधव (वय 23 रा. शंकरनगर पाथर्डी) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांना आरोपी सुधीर सिरसाठ हा कानडगाव (ता.राहुरी ) परिसरातील डोंगरांमध्ये त्याच्या साथीदारांसह लपून बसलेला आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कानडगाव परिसरातची माहिती घेऊन सापळा लावला. या दरम्यान डोंगरांमध्ये पाठलाग करून आरोपी सिरसाठ, वारे, डुकरे व जाधव यांना पकडण्यात आले. या आरोपींना पोलीस खाक्या दाखविताच पळून गेलेल्याचे केतन जाधव ( रा. शिक्षककॉलनी पाथर्डी) असे त्याचे नाव सांगितले. तसेच गुन्हा केल्याची माहिती दिली. यापूर्वी आरोपी डुकरे याच्यावर जेजुरी (पुणे), कराड (सातारा) तर गणेश जाधव याच्यावर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाला आहे.
दि.6 एप्रिल 2021ला सकाळी आरोपी सुधीर सिरसाठ याने मच्छिंद्र कारभारी फुंदे यांच्या टाकळीफाटा येथील साईप्रेम हॉटेल समोरी गाडी उभी केली होती. यावेळी विश्वनाथ फुंदे यांनी आरोपी सुधीर सिरसाठ याला हॉटेल समोरून गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्याचा राग मनात धरून आरोपी सिरसाठ याने त्याचे इतर साथीदारांना तेथे बोलावून घेतले. तिलोक जैन विद्यालय,पाथर्डी या शाळेच्या पाठीमागे विश्वनाथ फुंदे यांना आणून जबरदस्तीने दारू पाजून पुन्हा लोखंडी पाइप व रॉडने मारहाण करून त्यांचा खून केला. या मयताचा भाऊ मच्छिंद्र फुंदे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात भरावी कलम 302 364 143 147 148 149 323 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.