शासनाने गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी.- शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगांव, प्रभुपिंपरी, सुसरे, निपाणी जळगांव, साकेगांव, खेर्डे व कोरडगांव परीसरात (दि. २०) रोजी दुपारी ४ते ५ वा. प्रचंड प्रमाणात चक्रीवादळ व गारपीट झाली व शेतकऱ्यांच्या पिकांचे खुप मोठे नुकसान झाले. खेर्डे , पागोरी पिंपळगांव, प्रभु पिंपरी, सुसरे, सोमठाणे नलवडे या शिवारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा किसान मोर्चा अ.नगर दक्षिणचे सरचिटणीस शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी पाहणी केली व शेतकऱ्यांच्या व्यथा जानुन घेतल्या.
गेल्या ५० वर्षामध्ये इतक्या मोठया प्रमाणात गारपीट कधीही झाली नाही. शेतात,रस्त्यावर व घरासमोर व घरावर गारांचा ढिग साचला होता त्यामुळे शेतकऱ्यां पिकांचे १०० % नुकसान झाले त्याचबरोबर गरीब शेतकऱ्यांचे छप्पर व पत्रे तसेच संसार उपयोगी वस्तु उडून गेल्यामुळे गरीब शेतकरी रस्त्यावर आले आसून मन हेलवणारे चक्रीवाद गारपिट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आसुन नुकसानग्रस्त शेतकरी पुर्णपणे हवालदिल झाले आसुन त्यांना शासनाच्या आर्थिक मदतीची तातडीची गरज असून महाराष्ट्र शासनाने तातडीने शासकीय पथक पाठवून ताबडतोब पंचनामे करुन कधी नव्हे ऐवढया मोठ्या प्रमाणात शेतकरी संकटात सापडला असल्यामुळे शासनाने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळुन देऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहावे अशी मागणी व विनंती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी केंद्रशासन व महाराष्ट्र शासनास पञाद्वारे इमेलने केली आहे.