महाराष्ट्र
तिलोक जैन विद्यालयाच्यावतीने शहरात ग्राहक जनजागृती अभियान
By Admin
तिलोक जैन विद्यालयाच्यावतीने शहरात ग्राहक जनजागृती अभियान
पाथर्डी- प्रतिनिधी
भारत की आजादी का अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालय अंतर्गत भारतीय मानक ब्युरो व शहरातील श्री तिलोक जैन विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पाथर्डी शहरात आठवडे बाजारच्या निमित्ताने ग्राहक जनजागृती रॅलीचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे सचिव सतीश गुगळे, विश्वस्त धरमचंद गुगळे, डॉ. सचिन गांधी, प्राचार्य अशोक दौंड, उपप्राचार्य विजयकुमार छाजेड, भारतीय मानक ब्युरो क्लब चे मेंटॉर सुनिल कटारिया, को - मेंटॉर श्रीमती संध्या पालवे, अजय शिरसाट, जब्बार पठाण, बाळासाहेब गांगुर्डे आदिंसह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सकाळी शहरातील नाईक चौकापासून या रॅलीला सुरुवात झाली. शहरातील सर्व प्रमुख मार्गावरून या रॅलीने मार्गक्रमण करीत घोषणा देत ग्राहकात जनजागृती केली. ओ सोना , ओ सोना- हॉलमार्क देखके ही लेना , बी .आय .एस. है साथ तो डरने की क्या बात , बी . आय. एस को जानिए , ग्राहक संरक्षण किजीए, या सारख्या घोषणांनी परीसर दुमदुमून गेला. या रॅली दरम्यान विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सुंदर पथनाट्याद्वारे या रॅलीचा व अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांना पटवून दिला. रॅलीतील विद्यार्थ्यांचा बी .आय. एस. चा विशेष गणवेश नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
भारतीय मानक ब्युरो हे भारतातील सर्व उत्पादकांच्या उत्पादनांचे मानांकन ठरवते. समाजातील नागरीकांना स्टैंडर्डस किंवा मानांकनाचे महत्व कळावे, याचप्रमाणे बाजारातील आय.एस.ओ. किंवा आय.एस.आय.(ISI), हॉलमार्किंग उत्पादने खरेदी करतो. त्याची गुणवत्ता कळावी. त्यामध्ये ग्राहक म्हणून नागरिकांची फसवणूक होऊ नये. मोबाईल केअर ॲपचा वापर कसा करावा, आदी विषयांची माहिती या जनजागृती रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी नागरिकांना दिली. घरोघरी ग्राहकांच्या प्रत्यक्ष भेटीद्वारे देखील जनजागृती करण्याची योजना असल्याने भविष्यात ग्राहक म्हणून कुणाचीही फसवणूक होणार नाही.
तालुक्यात अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबवणारे श्री तिलोक जैन विद्यालय हे एकमेव विद्यालय आहे, अशी माहिती क्लब चे मेंटॉर प्रा.सुनिल कटारिया यांनी यावेळी दिली.
बुधवारी शहरात आठवडे बाजार असल्याने या उपक्रमामुळे हजारो नागरिकांपर्यंत संदेश गेला. पालक वर्गातून व समाजातून समाजहिताच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.
Tags :
649241
10