पाथर्डीत 'विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी' विषयी एक दिवसीय सेमिनार
पाथर्डी- प्रतिनिधी
येथील बाबूजी आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मराठी भाषा पंधरवडा निमित्त वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी या विषयावर एक दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले.सेमिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पवन कुमार धरक (चेअरमन अहमदनगर शाखा, आयसीएआय) सार्थक मरलेचा( सीए/ सी एस),गौतमी खाटेर (सीए) उपस्थित होते.
पवनकुमार धरक यांनी मार्गदर्शन करतांना वाणिज्य शाखेचे महत्त्व फक्त आपल्या देशासाठीच नव्हे, तर जगासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन केले. जगाच्या पाठीवर आज सी. ए ची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.भारतातील सी.ए ची जगात मागणी असते, म्हणून विद्यार्थ्यांनी सी. ए होऊन देश व जगाची सेवा करावी, असे आवाहन केले. सी. ए च्या परीक्षेची संपूर्ण माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच अन्य मार्गदर्शक सार्थक मरलेचा, गौतमी खाटेर यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.जी. पी. ढाकणे यांनी विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेतील संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.महारुद्र घुले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.अनिल नारखेडे यांनी तर आभार प्रा.माया पवार यांनी मानले.
कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यवेक्षक प्रा.शेखर ससाणे ,वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.डॉ.सुभाष शेकडे, ग्रंथपाल डॉ.किरण गुलदगड तसेच सर्व शिक्षक ,विद्यार्थी व विद्यार्थीनी आदी उपस्थित होते.