मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा.- डाॕ.कृषिराज टकले
By Admin
मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा.- डाॕ.कृषिराज टकले
नगर सिटीझन live टिम-
मराठा समाजातील तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी शासनाने आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला पाचशे कोटी निधी द्यावा.तसेच
मराठा समाजातील वाढती बेरोजगारी शेतकरी आत्महत्या मराठा आरक्षण या सर्व प्रश्नांना आत्तापर्यत शासनाने ऐरणीवर ठेवले आहे.आण्णासाहेब पाटील विकास महामंडळातून तरुणांना अपेक्षा आहेत.त्या पुर्ण होण्यासाठी महाविकास आघाडीने पाचशे कोटी निधी महामंडळास द्यावा.असे मत
पाथर्डी तालुक्यातील हञाळ येथील स्वाभिमानी महासंघाचे संस्थापक डाॕ. कृषिराज टकले यांनी स्वाभिमानी मराठा महासंघाची सहविचार सभा आॕनलाईन झूम मिटींग तसेच फेसबुक लाईव्ह द्वारे झालेल्या कार्यक्रमात संघटनेच्या सर्व सदस्य यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली.
स्वाभिमानी महासंघाची आढावा सहविचार सभा पार पडली.
शिव स्मारक , किल्ले संवर्धन ,मराठा आरक्षण आंदोलकावरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत ,स्वामीनाथन आयोग लागू करावा.शेतकऱ्यांना मोफत विज मिळावी.प्रकल्प ग्रस्ताना नोकरीत सामावून करुन घ्यावे.मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना मानधन सुरू करावे.भूमीहीन मराठ्यांना शासनाने जमीनी द्यावेत,मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांना वस्तीगृह सुरू करावे असे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहीजे.गेल्या पाच महीन्यापासून दिल्ली येथे सुरू असलेले शेतकऱ्यांचे किव भाजप सरकारला कधी येणार आहे.भाजप सरकारने कृषि कायदा पारीत करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा.या विषयावर डाॕ.टकले तसेच संघटनेचे पदाधिकारी तसेच सर्व सदस्य यांच्या बरोबर आॕनलाईन संवाद साधला.
यावेळी संघटनेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी अमोल म्हस्के यांची निवड करण्यात आली.
या बैठकी प्रसंगी स्वाभिमानी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे,युवक प्रदेशाध्यक्ष कैलास रिंधे, महीला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष अर्चना धुळे,नाशिक विभागीय कार्याध्यक्ष रावसाहेब कावरे, जिल्हाध्याक्ष अंकुशराव डांभे संघटनेच्या आॕनलाईन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या बैठकीसाठी युवकचे जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड,महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा फरताडे, जिल्हा उपाध्यक्ष कल्पना शेटे, नेवासा युवक तालुकाध्यक्ष निलेश बारहाते,युवक जिल्हा कार्याध्यक्ष किशोर लोढे,मराठा सुकानुचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे ,शेवगाव तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर उपस्थित होते.
स्वाभिमानी मराठा संघटनेची आॕनलाईन सहविचार सभेसाठी संघटनेचे रावसाहेब कावरे,कैलास रिंधे, अंकुशराव डांभे यांचे विशेष सहकार्य मिळाले.