महाराष्ट्र
78965
10
पाथर्डीतील नोकरी मेळाव्यात ६३० नियुक्तीपञे
By Admin
पाथर्डीतील नोकरी मेळाव्यात ६३० नियुक्तीपञे
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील तरुण-तरुणींसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांनी भरविलेल्या नोकरी मेळाव्यात दोन्ही तालुक्यातील तीन हजार तरुण-तरुणी उपस्थित होते. यातून ६३० जणांना जागेवर नियुक्तिपत्रे देण्यात आली, तर ८५७ उमेदवारांना जॉब कार्डचे वाटप करण्यात आले.
नोकरी मिळालेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळाले. ढाकणे यांच्यामुळे आम्हाला नोकरी मिळाल्याची भावना अनेकांनी बोलून दाखविली. दोन वर्षांपासून ढाकणे मतदारसंघात वेगवेगळ्या कारणाने फिरत लोकांशी संवाद साधत आहेत. संवाद साधत असताना त्यांना बेरोजगारीच्या मुद्दा प्रकर्षाने जाणवला. तसेच बेरोजगारीमुळे अनेक तरुणांनी
पाथर्डी येथील नोकरी मेळाव्यात नियुक्त्तीपत्र देताना खासदार नीलेश लंके, प्रताप ढाकणे व इतर. पाथर्डी शहरातील एम. एम. निहाळी विद्यालयात नोकरी मेळाव्याचे आयोजन ढाकणे यांच्याकडून करण्यात आले होते. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील १०० कंपन्यांचा सहभाग होता. युवा हब कंपनीचे किरण राहणे व दीपक पवार यांच्यामार्फत हा मेळावा घेण्यात आला होता. खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते नोकरी लागलेल्या युवक व युवतींना नियुक्तिपत्रे देण्यात आली. यावेळी
प्रताप ढाकणे, दादा महाराज नगरकर, 'केदारेश्वर'चे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, शिवशंकर राजळे, बंडू पाटील बोरुडे, माधव काटे, रफिक शेख, चंद्रकांत भापकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
लंके म्हणाले, काळाची गरज ओळखून प्रतापकाकांनी राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. मेळाव्यासाठी १०० कंपन्या येणे हे सोपे नसते. त्यामुळे प्रतापकाका आज अनेकांचे आधारवड बनले आहेत.
..तर माझी बेकारी दूर होईल
ढाकणे म्हणाले, ३० वर्षे मी बेकार (राजकीय) आहे. माझा अर्ज शरद पवार यांच्याकडे दिलेला आहे. त्यांनीही तो मंजूर केला आहे. तुम्ही मनावर घेतले तर माझी बेकारी दूर होईल, असे म्हणताच एकच हशा पिकला.
मला नोकरी मिळाली...
चेहऱ्यावर आनंद..
मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवार आले असले तरी नेटके नियोजन असल्यामुळे उमेदवारांना कशाचीही अडचण भासली नाही. दोन लाखांपासून चार लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज या विद्यार्थ्यांना मिळाले. नोकरी मिळाल्याचा आनंद तरुण- तरुणींच्या चेहऱ्यावर दिसत होता. मला नोकरी मिळाली हे घरातील तसेच आपल्या मित्रमैत्रिणी फोन करून सांगत होते.
Tags :

