पाथर्डी शहरातील बसस्थानकावर महिलांच्या दागिन्यांची चोरी
पाथर्डी - पाथर्डी शहरातील बसस्थानकावर होणान्या महिलांच्या दागिन्यांची चोरी व खिसे कापणाऱ्यांचा त्रास इतका वाढलाय की, आता सहनही होत नाही व सांगता येत नाही. शनिवारी दुपारी ज्योती बाळासाहेब गोल्हार रा. येळी, यांच्या पिशवीतील दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने व एक हजार रुपये रोख, असा सव्वालाख रुपयांचा ऐवज एका महिलेने बसमध्ये चढताना लांबविला. गेल्या महिनाभरात सुमारे सात घटना येथे घडल्या असून, लाखो रुपयाचा ऐवज चोरीला गेला आहे. महिलांना लुटणाऱ्या महिला आरोपीला पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
शहरातील जुने बसस्थानक, नवीन बसस्थानक, भाजीबाजार, नवी पेठ, डॉ. बाबासाहेब आबेंडकर चौक, या भागात नेहमी गर्दी असते. आठवडा बाजारात महिलांचे दागिने व पैसे लुबाडणाऱ्या चोरट्यांचा उपद्रव खुपच वाढला आहे. एसटी बसमध्ये चढताना महिलांचे दागिने चोरणे व पाकीटमारी वाढली आहे. शहरातील काही खिसेकापू आहेत. मात्र, आता बाहेर
गावाहून आलेले चोरटे हातचलाखी दाखवत आहेत.
नवीन बसस्थानक परिसरात रोजच चोऱ्या वाढल्या आहेत. शनिवारी दुपारी ज्योती बाळासाहेब गोल्हार रा. येळी ह्या पाथर्डी बसस्थानकावर पाथर्डी-बीड एसटीमध्ये चढत असताना त्यांच्या पिशवीतील दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने व एक हजार रुपये रोख, असा ऐवज एका महिलेने लांबविला
आहे. चोरी करणारी महिल सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. पिशवी हातात असलेली व लहान मुलगा सोबत असलेली महिला दागिने घेऊन पळाली आहे. ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसते आहे. ज्योती गोल्हार यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. नवीन बसस्थानक परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. खिसेकापू व महिलांचे दागिणे चोरणाऱ्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर