महाराष्ट्र
प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
By Admin
प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
जामखेड तालुक्यातील घटना: २४ तासांत आरोपी जेरबंद
नग सिटीझन live टिम प्रतिनिधी
जामखेड : प्रेम प्रकरणातून
एका अल्पवयीन मुलीने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना जामखेड तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत संशयितास अटक केली आहे. सुभाष लक्ष्मण लटके असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, चार दिवसापूर्वी जामखेड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. याबाबत तपास करत असतानाच सदर मलीत्ता मतदेह परिसरातील
विहिरीत आढळून आला आहे. याबाबत तपासाअंती सदरचा प्रकार प्रेम प्रकरणातून घडला असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार खर्डा पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित सुभाष लक्ष्मण लटके यास पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. दरम्यान या घटनेने त्या गावात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खर्डा पोलीस स्टेशनला चार दिवसापूर्वी एका अज्ञात व्यक्ती विरोधात तालक्यातील एका गावातील
अल्पवयीन मुलीचा अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिस तपासात सदरची मुलगी ही गावातील एका व्यक्तीकडून मोबाईल घेऊन तिने फोन लावला होता. त्यानंतर ती शेताकडे गेल्याचे सांगितले. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गावच्या पोलीस पाटलाच्या मदतीने या परिसरातील अनेक विहिरी तपासल्या असता एका विहिरीजवळ तिचा सँडल व ओढणी मिळून आल्याने स्थानिकांच्या मदतीने चार तासांच्या प्रयत्नानंतर अल्पवयीन मुलीचा त्या विहिरीत मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पातविण्यात आला त्यानंतर वर्दा करीत आहेत.
पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी तपासाचे चक्रे वेगाने फिरवत संशयित सुभाष लक्ष्मण लटके (वय २२ वर्षे रा. सातेफळ) यास पोस्को अंतर्गत तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर गुन्ह्याची उकल होणार आहे. सदर गुन्ह्याचा तपास डीवायएसपी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड व पोना संभाजी शेंडे, पोलीस अंमलदार शशिकांत म्हस्के हे तपास करत आहेत.
Tags :
68176
10