महाराष्ट्र
25216
10
संभाजीराव बडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राज्यस्तरीय
By Admin
संभाजीराव बडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राज्यस्तरीय उत्कृष्ट शाळा व्यवस्थापनपट्टू पुरस्काराने सन्मानित
पाथर्डी तालुका प्रतिनिधी - पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातराळ सैदापूर येथील शाळा व्यवस्थापन समितीचे तथा सामाजिक कार्यकर्ते श्री संभाजीराव बडे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्यातर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट शाळा व्यवस्थापनपट्टू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ. सुरेश गोसावी हे होते. यावेळी विचार मंचावर डॉ. अविनाश अन्सारी, डॉ. राजेश सिंह विभाग प्रमुख सांस्कृतिक विभाग तथा व्यवस्थापन परिषद सदस्य गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. महेंद्र ढोरे, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी पुणे विद्यापीठ इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार सोहळा करण्यात आला. संभाजीराव बडे हे गेल्या दहा वर्षापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातराळ सैदापूर येथे शाळा व्यवस्थापन समितीचे कामकाज अतिशय प्रभावीपणे चालवीत आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या वतीने अत्यंत मानाचा व सन्मानाचा हा पुरस्कार सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पदक देऊन करण्यात आला. जिल्हा परिषदांच्या मराठी माध्यमांच्या शाळा चांगल्या चालू राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अभियान राबवून जिल्हा परिषदांच्या शाळा देखील कोठेही कमी नाहीत. जिल्हा परिषदांच्या शाळा म्हणजे या विद्येचे माहेरघर आहेत. राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता अभियान, लेक शिकवा लेक वाचवा अभियानाद्वारे मुलींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. तसेच स्वामी विवेकानंद युवा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला. यावेळी अध्यक्षीय भाषणांमधून बोलताना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ. सुरेश गोसावी म्हणाली की, संभाजीराव बडे यांच्यासारख्या उमद्या तरुणाचा आदर्श इतर गावातील युवकांनी घेऊन शैक्षणिक क्षेत्रात आपल्या गावाचे वैभव वाढवावे. यावेळी जिल्हा परिषद शाळा हातराळ सैदापूर येथील सर्व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले. गावातील शाळेत प्रवेश घेतल्यास त्या पालकांची मिळकतीची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा एक अनोखा उपक्रम राबविला. आत्तापर्यंत संभाजीराव बडे यांना महाराष्ट्र शासनाचे विविध मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. राज्यस्तरीय समाजभूषण, समाज रत्न, जीवन गौरव, पुणे विद्यापीठ यांचा आदर्श शाळा व्यवस्थापक, मुंबई विद्यापीठ यांचा उत्कृष्ट शाळा व्यवस्थापनपट्टू असे विविध मानाचे व प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट शाळा व्यवस्थापनपट्टू पुरस्कार मिळाल्याबद्दल विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे साहेब, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार निलेश लंके, पाथर्डी शेवगावच्या लोकप्रिय आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे, पाथर्डी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अभय राव आव्हाड , हुतात्मा बाबू गेन संस्थेचे कुशल दादा भापसे इत्यादी मान्यवरांनी संभाजीराव बडे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला.
Tags :
25216
10




