महाराष्ट्र
54665
10
नगरपालिका निवडणूकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त
By Admin
नगरपालिका निवडणूकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकां साठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुकी करण्यात आल्या.जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले आहे.निवडणुकांचे कामकाज पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. नियुक्त अधिकारी निवडणुकी दरम्यान शासकीय मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
जिल्ह्यातील कोपरगाव नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती भारती सागरे (उपजिल्हाधिकारी) असतील. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश सावंत (तहसीलदार, कोपरगाव) व सुहास जगताप (मुख्याधिकारी, कोपरगाव नगरपरिषद)
संगमनेर नगरपरिषदेकरिता अरुण ऊंडे (उपविभागीय अधिकारी, संगमनेर) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून धीरज मांजरे (तहसीलदार, संगमनेर) व श्रीमती धनश्री पवार (मुख्याधिकारी, अकोले नगरपंचायत)
श्रीरामपूर नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत पाटील (उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर) असतील, तर सहायक अधिकारी म्हणून मिलींदकुमार वाघ (तहसीलदार, श्रीरामपूर) व मच्छिंद्र घोलप (मुख्याधिकारी, श्रीरामपूर नगरपरिषद)
जामखेड नगरपरिषदेकरिता नितिन पाटील (उपविभागीय अधिकारी, कर्जत-जामखेड) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून अजय साळवे (मुख्याधिकारी, जामखेड नगरपरिषद) व मच्छिंद्र पाडळे (नायब तहसीलदार, जामखेड)
शेवगाव नगरपरिषदेकरिता प्रसाद मते (उपविभागीय अधिकारी, पाथर्डी-शेवगाव) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून आकाश दहाडदे (तहसीलदार, शेवगाव) व श्रीमती विजया घाडगे (मुख्याधिकारी, शेवगाव नगरपरिषद)
Tags :
54665
10




