रस्त्यांसाठी मिळाले 85 कोटी- खा. डाॕ. सुजय विखे, पहा कोणते रस्ते होणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 23 एप्रिल 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नगर जिल्ह्यातील रस्त्याच्या विकासासाठी 84 कोटी 76 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. यातील नगर दक्षिण मतदार संघासाठी 47 कोटी 77 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सोनगाव ते चांदेगाव रस्त्यासाठी 4 कोटी 91 लाख, खरशिंदें ते मांजरी रस्त्यासाठी 3 कोटी 94 लाख, वरशिंदे ताराबाद ते मांजरी रस्त्यासाठी 2 कोटी 73 लाख असे 11 कोटी 59 लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला, शेवगाव तालुक्यातील खानापूर ते ठाकूर निमगाव रस्त्यासाठी 2 कोटी 73 लाख, पाथर्डी तालुक्यातील धमनगाव, मढी ते कोरडगाव, मालेगाव रस्त्यासाठी 12 कोटी 88 लाख, पारनेर तालुक्यासाठी गोरेगाव डिसाळ लोणी हवेली, शहांनजापूर सुपा रस्त्यासाठी 3 कोटी 98 लाख, कर्जत तालुक्यातील अरणगाव, वाळकी, देऊळगाव खांडवी रुईगव्हाण, कुलधरण, बरडगावन सुद्रीक ते राज्य महामार्ग 54 रस्त्यासाठी 3 कोटी 95
लाख, श्रीगोंदे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 161 ते काष्टी, मांडवगणच्या रस्त्यासाठी 12 कोटी 65 लाख असे 84 कोटी 76 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
केंद्र सरकारने नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गसाठी भरपूर निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे आपण नगर जिल्ह्यातील जनतेतर्फे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त करतो. नगर जिल्ह्यातील प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत पोहचेल.