महाराष्ट्र
74678
10
रक्षाबंधन बहिण भावाच्या नात्यातील स्नेह व रक्षणाचा संकल्प आहे-
By Admin
रक्षाबंधन बहिण भावाच्या नात्यातील स्नेह व रक्षणाचा संकल्प आहे- जैन साध्वी स्नेहाश्रीजी
पाथर्डी शहरातील जैन स्थानकात सामुदायिक रक्षाबंधन उत्साहात
पाथर्डी प्रतिनिधी:
रक्षाबंधन म्हणजे केवळ हातावर धागा बांधने नाही, तर आपल्या बहीन भावाच्या पवित्र नात्यातील स्नेह आणि विस्वासाच्या रक्षणाचा तो संकल्प आहे. तो संकल्प आयुष्यात कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी सांभाळून नात्यातील गोडवा कायम टिकवावा, असे आवाहन जैन साध्वी स्नेहाश्रीजी यांनी केले.
पाथर्डी शहरातील जैन स्थानकात राखीपौर्णिमेची पर्वणी साधत सामुदायिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जैन साध्वी उपप्रवर्तिणी चंद्रकलाश्री महाराज यांच्या संकल्पनेतून हा आगळावेगळा सोहळा बहिणींनी आपल्या भावांचे औक्षण करून व राख्या बांधत बहीण भावाचे नाते घट्ट करण्याचा संकल्प यावेळी केला.
या उपक्रमा निमित्ताने जैन स्थानकाच्या भव्य सभागृहात आकर्षक सजावट करण्यात आली होती. भिंतीवर मोठ्या आकर्षक राख्यांचे प्रतिके लावण्यात आले होते. भक्तीमय व आनंदी वातावरणात उपस्थित बहीण भावासाठी विशेष बक्षिसे देण्यात आली. यावेळी शहरातील अनेक दानशूर व्यक्तींनी दिलेल्या ५१ सोने, चांदीच्या राख्या ही वाटण्यात आल्या. जैन युथ फेडरेशनच्या वतीने सर्व उपस्थित भगिनींना सजावट केलेली आकर्षक पुजाथाळी भेट देण्यात आली.
यावेळी महासती स्नेहाश्रीजी म्हणाल्या, भारतीय संस्कृतीत अनेक सण व उत्सव साजरे होतात. यामध्ये प्रत्येक सण एक संदेश देत असतो. प्रत्येक उत्सवाला एक वेगळे महत्त्व आहे. प्रत्येकाने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत नात्यांचे महत्त्व समजून कायम त्या नात्यात आदर भावना ठेवावी. भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून या बहीण भावाच्या पवित्र सणाला वेगळे महत्त्व आहे. रक्षाबंधनाचा सण हा भाऊ - बहिणीमधील असलेले कौटुंबिक प्रेम वृध्दिंगत करणारा आहे. राखीच्या दोऱ्याचा रंग कदाचित उद्या फिक्का पडेल. मात्र बहीण भावाच्या अंतर्मनातले प्रेम कायम टिकून ठेवा. सर्व समाजातील महीलाप्रती आदर बाळगा, त्यांना बहीणी प्रमाणे वागवा. बहीणीनींही कौटुंबिक मर्यादा व संस्कार सांभाळावेत,असे आवाहन केले.
कार्यक्रमासाठी शहरातील उद्योजक जे.मो.गुगळे परिवाराने विशेष सहकार्य केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जैन युथ फेडरेशन व जैन श्रावक संघाने विशेष परिश्रम घेतले.
Tags :
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/like.png)
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/chat.png)