नगर जिल्हा सहकारी बॅंकेतील अनेक कर्मचारी कोरोना पाॕझिटिव्ह तर सात कर्मचाऱ्यांचा मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 22 एप्रिल 2021
जिल्हा बँकेच्या विविध शाखेत अनेक कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह आले असून, यामध्ये ७ कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बँकेच्या कामकाजाची वेळ बदलण्याच्या मागणीचे निवेदन कर्मचारी संचालक अशोक पवार यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन उदय शेळके यांना दिले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना, काही कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहे. काही कर्मचारी बरे झाले असून, काहींवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.
लॉकडाऊनमुळे बँक व्यवहार कमी झाले असून, नागरिक कमी संख्येने येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
कोरोना परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बँकेच्या मुख्य कार्यालयासह सर्व शाखांच्या कामकाजाची वेळ कमी करावी, सेवकांना रोटेशन पध्दतीने काम करण्याची परवानगी देण्याची मागणी कर्मचारी संचालक पवार यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन शेळके यांच्याकडे केली आहे.