आश्रमशाळा खडकेद येथे संविधान दिन साजरा
इगतपुरी तालुका -प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक आश्रमशाळा खडकेद ता. इगतपुरी जि. नाशिक येथे संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सह संविधानाच्या प्रतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी भारतीय संविधाना विषयी माहिती सांगितली. तर संविधानाचे सर्वानुमते वाचन करण्यात आले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सुरेश निगळे सर यांनी संविधानाविषयी सविस्तर माहिती सांगितली.यावेळी मुख्याध्यापक सुरेश निगळे सर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भावराव रोंगटे सर यांनी केले.