कासार पिंपळगाव-रस्त्यावर विनाकारण फिरणा-या, तोडांला मास्क न वापरणा-या नागरिकांना विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे यांची समज
नगर सिटीझन live टिम - प्रतिनिधी 20 एप्रिल 2021
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव,हनुमान टाकळी,आदिनाथनगर परीसरात विनाकारण, विनामास्क फिरणा-या नागरिकांना विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे तसेच ग्रामविकास अधिकारी प्रमोद म्हस्के यांनी शुक्रवारी चांगलीच समज दिली.तसेच प्रशासकीय यञंणेचे पालन न करणाऱ्या नागरिकांना समजावून सांगितले.
परीसरात वृद्धेश्वर कारखाना परीसरात सहकारी बॕक,स्टेट बॕक,पोस्ट आॕफीस,पतसंस्था कार्यालये असल्याने या भागात नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते.या परीसरात ऊसतोडणी मजूर,बॕक कर्मचारी,कारखाना कर्मचारी असल्याने गर्दीचे ठिकाण आहे.
आदिनाथनगर परीसरात लाॕकडाऊन असुनही शुक्रवारी अनेक नागरिक विना मास्क तसेच विनाकारण रस्त्यावर गर्दी करताना दिसले.या नागरिकांना प्रशांत तोरवणे यांनी आपण विनाकारण रस्त्यावर का फिरतात,तसेच तोंडाला मास्क का वापरत नाहीत? तसेच मास्क वापरा अशा सुचना दिल्या.तसेच यापुढे विनामास्क तसेच विनाकारण फिरताना दिसल्यास दंडात्मक कारवाई प्रशासनाकडून करण्यात येईल अशा सुचना दिल्या.तसेच परीसरातील जिल्हा सहकारी बॕक शाखेला भेट देवून येथील अधिकारी तसेच काम करणारे कर्मचारी तसेच येथे बॕक कामासाठी आलेले नागरिक यांना योग्य ती काळजी घ्या.तसेच मास्क व सॕनिटाईझरचा वापर नियमितपणे वेळोवेळी करा असे समजावून सांगितले.तसेच येथील वृद्धेश्वर सहकारी कारखान्यात जावून येथील प्रशासकीय यंत्रणा तसेच कर्मचारी योग्य ती खबरदारी घेतात कि नाही,याची पाहणी केली. तसेच येथील अधिकाऱ्यांना सांगितले कि मास्क न वापर-या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी.तसेच या परीसरात कर्मचाऱ्यांची गर्दी करु नये.तसेच सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.अशा सुचना येथील प्रशासकीय यंत्रणेला दिल्या. ग्राम पंचायत कर्मचारी सचिन लवांडे,तुकाराम कांबळे यांनी रस्त्यावर विनाकारण विनामास्क फिरणा-या नागरिकांवर दररोज लक्ष ठेऊन आहेत.