महाराष्ट्र
141389
10
आई-वडिलांची सेवा करा, देव भेटणारच : हभप इंदोरीकर महाराज
By Admin
आई-वडिलांची सेवा करा, देव भेटणारच : हभप इंदोरीकर महाराज
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जन्म, मृत्यू, निसर्ग हे देवाच्या हातात आहे. पण जन्म आणि मृत्यू यांच्या मधला जो काळ आहे. तो मानवाच्या हातात आहे. त्याला तीन टप्पे आहेत, पहिला बालपण, दुसरा तरुणपण व तिसरा म्हतारपण. बालपण हे आई-वडीलांनी दिलेल्या संस्कारावर अवलंबून आहे. तरुणपण हे तुमच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे. आणि म्हतारपण हे केलेल्या पुण्याईवर अवलंबून आहे. देवाची पुजा केल्यावर देव मिळेलच अस नाही, पण आई-वडीलांची सेवा केल्यावर देव भेटणारच यात मात्र शंका नाही. संपत्ती मिळाल्यावर सुख मिळेल, पण समाधान मिळेलच असं नाही, पण समाधान मिळाल्यावर देव मिळेलच यात शंका नाही, असे मत ह.भ.प. इंदोरीकर महाराज
यांनी व्यक्त केले. दातरंगे मळा येथील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान व
पर्जन्येश्वर महादेव मंदिर आयोजित भव्य किर्तन सोहळ्यात ह.प.भ इंदोरिकर
महाराज बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी महापौर रोहिणीताई शेंडगे,
संपर्कप्रमुख दिलीप सातपुते संभाजी कदम, जिल्हापमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख
सचिन जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सभापती गणेश कवडे, गटनेते संजय
शेंडगे, माजी नगरसेवक अर्जुन भाऊसाहेब दातरंगे, भिमराज दातरंगे, अनिल दातरंगे, ठकाराम दातरंगे, गुलाब दातरंगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप दातरंगे, अशोक दातरंगे , सुरेश दातरंगे, दत्ता दातरंगे, गणेश दातरंगे, अशोक आगरकर, रमेश आगरकर, स्वप्निल दातरंगे, बाबा दातरंगे, चंद्रकांत दातरंगे, बंडू दातरंगे, बाळासाहेब दातरंगे, भरत आगरकर, रोहिदास दातरंगे, दिलीप दातरंगे, सोनू दातरंगे, सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, शाम नळकांडे, सचिन शिंदे, संतोष ग्यानप्पा, परेश लोखंडे, अजय चितळे, अनिल बोरुडे, संजय
चोपडा, सुरेश तिवारी, महेश लोंढे, अरविंद शिंदे, दत्ता कावरे, विष्णु फुलसौंदर, सूरज जाधव, सुनिल त्रिपाठी, संजय शेळके, विठ्ठल जाधव, संजय सांयगावकर, रमेश खेड़कर, अरुण झेंडे, अशोक दहीफळे, शंकर ठाणगे, राजमल मुनोत, बबन खरमाळे, देवराम मेहेत्रे आदी उपस्थित होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप दातरंगे म्हणाले की, आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजोपयोगी उपक्रम राबबित असतो. सुखी जीवन जगण्यासाठी संतांचे विचार आपल्या सोबत असायला हवे. तसेच नागरीकांना संतांचे विचार समजावे, त्यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षापासून या किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
Tags :
141389
10





