शेवगांव शहरात भोई गल्ली भागातील शेळके यांच्या वाड्यात बांधकामाची खोदाई करताना सापडली तिजोरी पहायला गावं झाले गोळा !!
शेवगाव- प्रतिनिधी
या बाबत सविस्तर वृत्त असे की शहरात भोई गल्ली भागातील रमेश पद्माकर शेळके उमेश पद्माकर शेळके आणि नितीन पद्माकर शेळके यांच्या मालकी च्या वाड्यात बांधकामाची खोदाई करताना दोन दिवसांपूर्वी सापडली तिजोरी शेजारी राहणाऱ्या समर्थ वारकडं य तरुणाने शेवगांव पोलिसांना फोन करून सांगितले की आमच्या घराशेजारी शेळके यांच्या बांधकामात गुप्त धन असलेली तिजोरी सापडली आहे शहानिशा करण्यासाठी पोलीस पथक तिथे गेले असतात तो पर्यंत हि बातमी वाऱ्यासारखी शेवगाब शहरात पसरली तिजोरी नमिळालेले गुप्त धन पाहण्यासाठी हौशे गवशे आणि नवशे यांनी तोबा गर्दी केली आमच्या प्रतिनिधीने सखोल माहिती घेतली असता हि तिजोरी कै. माधवराव नारायणराव शेळके यांच्या नावाची होती पूर्वी शहराची पाटीलकी शेळके घराण्याकडे असल्याने व त्यांचे शहरात आजही बाजारपेठ धनगर गल्ली मारवाडगल्ली आणि भोई गल्ली भागात जुने वाडे असल्याने पाटीलकी असल्याने गावगाड्याचे जुने कागतपत्र आणि ऐवज सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे तिजोऱ्या होत्या त्यातीलच हि एक पण बोबाटा झाल्याने गावं झाला गोळा
शेवगांव सहाराच्या जुन्या भागात भारदे गल्ली ब्राम्हण गल्ली माली गल्ली मारवाड गल्ली नाईकवाडी मोहल्ला धनगर गल्ली खालची वेस या भागात अनेक जुने वाडे असल्याने व गेली कित्येक पिढ्या इथे एकाच परिवाचे लोक राहत असल्याने खोदाई करताना जुन्या मूर्ती तिजोऱ्या ऐतिहासिक पुरावे महादेवाचीपिंड विठ्ठल रखुमाईच्या मुर्त्या सापडल्याचे दाखले आहेत पण गुप्त धन सापडल्याच्या अफवेने शेळके परिवाराची अख्खी भावकी खुप मोठ्या आशेने या तिजोरीवर दावा सांगण्यासाठी गोळा झाली होती.