महाराष्ट्र
सहा महिन्यांत केंद्रात सत्तापालट होईल : पाटील
By Admin
सहा महिन्यांत केंद्रात सत्तापालट होईल : पाटील
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव : लोकसभा निवडणुकीत
भारतीय जनता पक्षाला अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने त्याचा राज्यातील विधानसभेला फटका बसू नये म्हणून भाजपाने हरियाणा विधानसभेसोबत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका घेणे टाळले आहे. मात्र, आता काहीही झाले राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचेच सरकार बहुमताने येणार असून, निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत केंद्रात सत्तापालट होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित शिवस्वराज्य यात्रेच्या खंडोबा मैदान, शेवगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
खा. डॉ. अमोल कोल्हे, खा. डॉ. निलेश लंके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संभाव्य उमेदवार अॅड. प्रताप काका ढाकणे, पैठणचे मा. आ. संजय
हजारोंच्या उपस्थितीत शेवगाव मध्ये शिव स्वराज्य यात्रा संपन्न
वाघचौरे, केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिता राजळे, शेवगावचे तालुकाध्यक्ष हरिश भारदे, शहराध्यक्ष बाळासाहेब डाके, तालुका उपाध्यक्ष सुभाष रावजी लांडे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष शेवगावचे मा. उपनगराध्यक्ष वजीर पठाण, मा. सरपंच एजाज काजी, पाथर्डी तालुका काँग्रेस अध्यक्ष नजीर भाई शेख, गहिनीनाथ शिरसाठ, देवा पवार, योगेश रासने, संपत मगर, अशोकराव गायकवाड, बद्रीनाथ बरगे,
श्रीकांत धुमाळ, रामराव चव्हाण, सविता भापकर, आरती निहऱ्हाळी, हुमायून आतार आदी यावेळी उपस्थित होते.
खा. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला कमी जागा मिळाल्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. म्हणून ते केवळ मते मिळविण्यासाठी पोकळ घोषणा करीत आहेत.
खा. डॉ. नीलेश लंके म्हणाले की, शेवगाव- पाथर्डी तालुक्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला पिण्याच्या पाण्याचा
प्रश्न तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न महाविकास आघाडी सरकार निश्चित सोडवणार आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचा उमेदवार अॅड. प्रताप काका ढाकणे यांना आपण विधानसभेत पाठवावे.
अॅड. प्रताप ढाकणे म्हणाले की, सध्याच्या सत्तेवर असलेल्या लोकप्रतिनिधींनी शेवगाव - पाथर्डीचा विकास १० वर्षांनी मागे नेला आहे. ताजनापूर लिफ्ट योजनेचे काम अनेक वर्षापासून रखडलेले आहे. या भागाचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वसामान्य माणसांच्या समस्या सोडवणारा आपल्या हक्काचा माणूस विधानसभेत पाठवा.
या वेळी महबूब शेख, सुनील गव्हाणे, मा.आ. संजय वाघचौरे, पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, महिला जिल्हाध्यक्षा योगिता राजळे, अमोल फडके, बंडू बोरुडे, वजीर पठाण यांचीही भाषणे झाली. माधव काटे यांनी प्रास्ताविक केले. गणेश सरोदे, अपर्णा शेळगावकर व सुरेखा वाघमोडे यांनी सूत्रसंचालन केले. हरिष भारदे यांनी आभार मानले.
Tags :
66360
10