महाराष्ट्र
11214
10
जागतिक महिला दिनानिमित्त पारंपारिक वेशभूषा व पाककला स्पर्धा
By Admin
जागतिक महिला दिनानिमित्त पारंपारिक वेशभूषा व पाककला स्पर्धा
अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान व मैत्रेय ग्रुपचा उपक्रम
पाथर्डी प्रतिनिधी:
येथील अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान व मैत्रेयी ग्रुपने पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली पारंपारिक वेशभूषा व पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमासाठी अध्यक्षा कविताताई आव्हाड, प्रमुख पाहुणे म्हणून सीमा लाहोटी व दिपाली बिहाणी तर व्यासपीठावर दिपालीताई बंग, डॉ. मनीषा खेडकर, प्रगती बडे, डॉ. आरती जायभाय, डॉ. मनीषा घुले, डॉ.अंबिका वाघ, डॉ. शुभांगी गर्जे, मनीषा घुले उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना मैत्रेयी ग्रुपच्या अध्यक्षा कविता आव्हाड म्हणाल्या, पारंपारिक वेशभूषा ही भारताच्या समृध्द सांस्कृतिक वारशामध्ये आणि विविध सामाजिक परंपरांमध्ये खोलवर रुजलेली आहे. ही वेशभूषा देशाच्या सांस्कृतिक अस्मितेचा एक भाग असून देशाचा इतिहास आणि सामाजिक जीवन दर्शवितात. पाश्चात्य संस्कृतीचे खुळ डोक्यात घेऊन तिचे अंधानुकरण करणाऱ्या आजच्या युवापिढीला देशातील पारंपारिक वेशभूषेबद्दल माहिती करून देणे आवश्यक आहे. भारत देशात विविधतेत एकता आहे आणि त्याचे द्योतक ही वेशभूषा स्पर्धा आहे, अशा त्या शेवटी म्हणाल्या.
यावेळी विद्यार्थिनीनी राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी, शिवरायांचा मावळा, सिंधुताई सपकाळ आदी महिलांच्या तसेच दाक्षिणात्य, महाराष्ट्रीयन, बंगाली आदी प्रादेशिक वेशभूषा सादर केल्या. वेशभूषा स्पर्धेत सर्व मुलीनी पारंपारिक वेशात रॅम्प वॉक केला. वेशभूषा स्पर्धेत शिशु गटापासून ते महाविद्यालयीन युवती अशा ८५ विद्यार्थिनीनी सहभाग घेतला. पाककला स्पर्धेसाठी शहरातील ६० महिलांनी सहभाग घेतला.
वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण सीमा लाहोटी यांनी तर पाककला स्पर्धेचे परीक्षण दिपाली बिहाणी यांनी केले. वेशभूषा स्पर्धेत शिशु गट प्रथम क्रमांक सई साखरे, पहिली ते पाचवी प्रथम क्रमांक स्वरांजली नरोटे, सहावी ते दहावी श्रेया दौंड तर महाविद्यालय गटात शिवकन्या खेडकर हिने प्रथम क्रमांक मिळविला.पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक राखी लुणावत द्वितीय क्रमांक दीप्ती बाहेती व मोनिका गुगळे तर तृतीय क्रमांक कोमल तारापुरे, नीता जिरेसाळ व जयश्री बाफना यांना विभागून देण्यात आला. उत्तेजनार्थ बक्षिसे शीतल घोरतळे, स्नेहल उरणकर, प्रतिभा देशमुख, माधुरी सरोदे, सुनंदा मरकड यांना देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुरेखा चेमटे, सुत्रसंचालन डॉ. वैशाली आहेर तर आभार डॉ.
आशा पालवे यांनी मानले.
Tags :

