विद्यार्थ्यांसह नागरिकांना दिलासा ; प्रतिज्ञापत्राची 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाखो विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.राज्यातील शासकीय कार्यालयात दाखल कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रकासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचें मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत.
महसूल मंत्र्यांच्या या निर्णयामुळे एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित अर्ज लिहावा लागणार आहे.साध्या अर्जावर तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र मिळणार आहे. तसेच दहावी,बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांना प्रतिज्ञापत्र लागते त्यासाठी लागणारा एकूण 3 ते 4 हजारांचा खर्च वाचणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांनां याचा मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर आता जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र,नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासह इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व प्रमाणपत्रांना जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क आता जोडावे लागणार नाही.
विशेषत : दहावी बारावीच्या निकालानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांना ही सर्व प्रमाणपत्र जोडावी लागतात. या प्रतिज्ञापत्रकासाठी लागणारा साधारणता खर्च आता महसूलमंत्र्यांच्या या निर्णयामुळे वाचणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.