महाराष्ट्र
52049
10
गणित- विज्ञान प्रदर्शनातून शास्त्रज्ञ निर्माण होतील- डॉ.बबन चौरे
By Admin
गणित- विज्ञान प्रदर्शनातून शास्त्रज्ञ निर्माण होतील- डॉ.बबन चौरे
श्री विवेकानंद विद्यामंदिर मध्ये शालेयस्तर गणित- विज्ञान संपन्न
पाथर्डी प्रतिनिधी:
पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी या विद्यालयात दरवर्षीप्रमाणे शालेय स्तरीय गणित विज्ञान व चित्रकला प्रदर्शन वर्ष १६ वे नुकतेच उत्साहात संपन्न झाले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य बी.ए. चौरे होते. याप्रसंगी ते म्हणाले, की विज्ञानामुळे जग जवळ आले आहे. विज्ञानामुळे भारताने अनेक संशोधन केले आहे. विज्ञानामुळे मानवाचे जीवन सुखकारक झाले आहे. विज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष जीवनात करणे आवश्यक आहे या संशोधनाचा उपयोग विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात करून घ्यावा. शालेयस्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनातूनच विद्यार्थ्यांना विषयाची आवड निर्माण होईल व यातूनच भारताचे भावी शास्त्रज्ञ निर्माण होतील, असे आपल्या भाषणात म्हणाले. प्रदर्शनाचे उद्घाटन माजी प्राचार्य अशोक दौंड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रा.अशोक दौंड म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीचे प्रत्येक दिवस हा विज्ञानापासून सुरू होतो. वैज्ञानिक संशोधनामुळे आज समाजात अंधश्रद्धेचे निर्मूलन झाले आहे.विज्ञानामुळे भारत देशाची प्रगती झपाट्याने होत आहे.वैज्ञानिक संशोधनामुळे भारत देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे. शालेय स्तरावर गणित विज्ञान प्रदर्शन राबविल्याने अनेक विद्यार्थ्यांना संधी प्राप्त होऊन विद्यार्थ्यांमध्ये अवघड असणाऱ्या विषयाची भीती दूर होते.विद्यार्थ्यांमध्ये विविध संकल्पना दृढ होतात. विद्यार्थ्यांना विविध दाखले देऊन प्रेरित केले.यावेळी मुख्याध्यापक शरद मेढे यांनी गणित व विज्ञान विषयाचे महत्त्व अनेक उदाहरणे देऊन पटवून दिले.बालशास्त्रज्ञांना व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
शालेयस्तरीय प्रदर्शनात इयत्ता तिसरी ते पाचवी गणित व विज्ञान गट, इयत्ता सहावी ते आठवी गणित व विज्ञान गट तसेच इयत्ता नववी व दहावी गणित व विज्ञान गट अशा तीन गटात उपकरणांची मांडणी व नियोजन करण्यात आले. तीन गटात मिळून गणित विभागाचे ७६ उपकरणे तर विज्ञान गटाचे १२४ उपकरणे विद्यार्थ्यांनी तयार केली. सदर प्रदर्शनात ४८ वैज्ञानिक रांगोळ्या तर चित्रकला दालनात ४६८ चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले, या कलादालनात सर्वेश उगार या विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ 'राममंदिर प्रतिकृती' लक्षवेधक ठरली. तसेच प्राथमिक विभागातील सर्व शिक्षिकांनी 'जल है तो कल है' या विषयावर रेखाटलेली रांगोळी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. प्रदर्शन पाहण्यासाठी पालक वर्गाने प्रचंड प्रतिसाद दिला. प्रदर्शनातील उपकरणांचे परीक्षण करण्यासाठी बाबूजी आव्हाड महाविद्यालयातील प्राध्यापकांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड, शिक्षण विस्तारअधिकारी जि. प. माध्य.विभाग सुरेश ढवळे, मा. प्राचार्य अशोक दौंड,प्राचार्य डॉ. बी. ए. चौरे, मुख्याध्यापक शरद मेढे, समन्वयक ज्ञानेश्वर गायके, प्राथ. विभागाच्या मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी,पर्यवेक्षक संपत घारे , अभिजीत सरोदे,विठ्ठल धस, अर्चना दराडे,दीपक राठोड, अर्चना धायतडक, निखिल देशमुख, स्नेहल बोराडे,माधुरी रणदिवे,सतीश बोरुडे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर गायके यांनी केले तर सूत्रसंचालन स्नेहल बोराडे माधुरी रणदिवे यांनी केले. आभार अनुजा कुलकर्णी यांनी मानले.प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Tags :
52049
10





