कवडदरा विद्यालयाच्या १२ विद्यार्थी खेळाडूची जिल्हास्तरावर निवडीबद्दल विद्यार्थी व शिक्षक यांचा सन्मान
कवडदरा- भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा(इगतपुरी) विद्यालयात विद्यालयातील १२ कुस्ती खेळाडू यांची जिल्हा स्तरावर निवड झाली.त्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य/मुख्याध्यापक श्री.बी.एस.पवार सर यांनी विद्यार्थी खेळाडू तसेच मार्गदर्शक शिक्षक अमोल म्हस्के यांचा शाल व फुल देवून सत्कार सन्मान करण्यात आला.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी सर्व विद्यार्थी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे मुख्याध्यापक/प्राचार्य बी.एस.पवार सर तसेच सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.पुढील स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या.