'या' इजेक्शनचा काळाबाजार होणार नाही याची काळजी घेणार - तनपुरे
By Admin
'या' इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही याची काळजी घेणार - नामदार मंञी प्राजक्त तनपुरे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - मंगळवार 04 मे 2021
जिल्ह्यात रेमडेसीवीर चा काळाबाजार होणार नाही.याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे.
राज्यमंञी तनपुरे म्हणाले,रेमिडीसिविर इंजेक्शनचा मर्यादित येणारा साठा वितरीत करण्यात जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियमांची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे.रुग्णांच्या अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी येणार नाही याकडे लक्ष देण्याची सुचना त्यांनी केली.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन मध्ये निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच आरोग्य विषयक बाबींकडे अधिक लक्ष दिले जात आहे.जिल्ह्यात रेमडीसीविर इंजेक्शन चा काळा बाजार होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल,असे प्रतिपादन नगरविकास,ऊर्जा,आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली.त्यावेळी ते बोलत होते.जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले,महापालिका आयुक्त शंकर गोरे,निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांच्यासह विविध प्रशासकीय विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
हॉस्पिटलने वापरलेल्या रिकाम्या व्हायल जपून ठेवून त्याचा हिशोब महानगरपालिका आयुक्तांनी घेऊन इंजेक्शनचा काळा बाजार होणार नाही याची दक्षता घ्यावी.त्यादृष्टीने रुग्णालयांना निर्देश द्यावेत,अशी सुचनाही त्यांनी केल्या.या बैठकीदरम्यान इंडीयन मेडिकल असोसिए शनच्या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्री तनपूरे यांची भेट घेतली.या भेटीदरम्यान त्यांनी विविध समस्या मांडल्या.हॉस्पिटलमध्ये लावण्यात येणाऱ्या ऑक्झिजन प्लांट संदर्भात नगरविकास विभागाद्वारे शिथिलता आणण्या ची मागणी लेखी निवेदनाद्वारे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली.निवेदनानुसार मंत्रालय मुंबई येथे नगरविकास विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यां बरोबर बैठक लावण्याचे डॉक्टरांना आश्वस्त केले.तसेच अहमनगर जिल्ह्याला मिळणाऱ्या ऑक्सिजन पुरवठयासंदर्भात सुसूत्रता यावी या डॉक्टरांच्या सूचना अमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

