महाराष्ट्र
263409
10
मनाच्या एकाग्रतेसाठी योग प्राणायाम महत्त्वाचे माध्यम- अभय आव्हाड
By Admin
मनाच्या एकाग्रतेसाठी योग प्राणायाम महत्त्वाचे माध्यम- अभय आव्हाड
श्री विवेकानंद विद्यामंदिर मधील २१०० विद्यार्थ्यांची योगसाधना
पाथर्डी प्रतिनिधी:
योग प्राणायामाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभते. मन निरोगी व शांत ठेवण्यासाठी योग प्राणायामाचे महत्त्व भारतीय संस्कृतीत विशद केलेले आहे.यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज किमान अर्धा तास योगप्राणायाम केल्यास मनाची एकाग्रता व शारीरिक सदृढता निर्माण होईल. योगामुळेच एकाग्रता व सुदृढता वाढते,असे उद्गार अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग ध्यानधारणा शिबिराप्रसंगी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले.
अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी येथे विद्यालयातील शिक्षकांसह २१०० विद्यार्थ्यांनी योग प्राणायामाचे धडे गिरविले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून २०१४ पासून योगदिनाची सुरुवात झाली. या दिवशी देशातील संपूर्ण शाळेत योगदिन उत्साहात साजरा केला जातो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यायाम, उत्तम आहार तसेच योग प्राणायामाचे धडे दिले जातात. यातून सदृढ व निरोगी भारत तयार होईल. मन आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी योगा अत्यंत गरजेचे असून 'स्वस्थ रहा,मस्त रहा,असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले.
यावेळी विद्यालयातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांसह २१०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून योगसाधना केली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी विविध प्राणायाम प्रात्यक्षिके व शारीरिक हालचाली करून मनसोक्त आनंद लुटला. या सर्व विद्यार्थ्यांना योगशिक्षक डॉ. सुनीता डागा व कल्पना जायभाय यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापक शरद मेढे, समन्वयक ज्ञानेश्वर गायके,मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी, योगशिक्षिका डॉ. सुनिता डागा, कल्पना जायभाय,विश्वास जायभाय, पर्यवेक्षक संपत घारे, क्रीडाशिक्षक रावसाहेब मोरकर, सतीश डोळे व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर उपस्थित होते.
Tags :
263409
10





