कै. सुमनताई ढाकणे कोविड सेंटरमध्ये संगीत मैफीलीचे आयोजन
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील ॲड. प्रतापकाका ढाकणे यांनी सुरू केलेले कै. सुमनताई ढाकणे कोव्हिड सेंटर येथे रुग्णाच्या मनावरील ताण हलका करण्याकरिता संगीत गायन मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.
अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध गायक जनार्धन बोडखे, विष्णू बुगे, अरुण भारस्कर, संजय उरसुळे या गायक कलाकारांसह कलाशिक्षक गणेश सरोदे, राष्ट्रवादीचे देवा पवार, फारुख भाई शेख या कलाकारांनी विविध प्रकारचे भक्ती गीते, गवळण, नविन - जुने गीते सादर करून सर्व प्रेक्षक व कोव्हिड रुग्णांचे मन प्रसन्न केले.
नंतर 'झिंगाट' या गाण्यावर तर सर्व संयोजन समिती सदस्य व कोरोना रुग्णांनी मनमुरादपणे नाचण्याचा आनंद घेतला.
या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे कार्यक्रम सुरू झाल्यापासून रात्री ८ ते १० वाजेपर्यंत राष्ट्रवादीचे प्रताप (काका) ढाकणे यांनी फेसबुकच्या माध्यमातून लाइव्ह हा कार्यक्रम पाहिला.
तसेच सर्व गायक कलाकारांचे मनापासून कौतुक केले.
शेवटी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश रासने, मुख्य समन्वयक शिवाजी बडे, बाळासाहेब ढाकणे, महादेव आव्हाड, श्रीकांत नि-हाळी, सुधाकर सानप, पप्पू शिरसाट, वैभव दहिफळे, मिनीनाथ भंडारी यांनी सर्व गायक कलाकारांचे अभिनंदन करून आभार मानले.