अहमदनगर जिल्ह्यातील आजच्या ठळक घडामोडी - बातमी पञ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 16 मे 2021, रविवार
मार्केट यार्डमधील दुकाने 1 जूनपर्यंत बंद राहणार, आयुक्त शंकर गाेरे यांचा आदेश; साेमवारपासून कांदा मार्केट सुरू हाेणार
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 36 तासांत 3 हजार 144 जणांना काेराेना संसर्गाचं निदान; नगर तालुक्यात सर्वाधिक 465 रुग्ण आढळले
जनकल्याण रक्तपेढीला प्लाझ्मासाठी अफेरेसिस मशिनची भेट; शांतिकुमारजी फिरोदिया मेमाेरियल फाऊंडेशनचा उपक्रम
श्रीरामपूर हेल्पिंग हॅण्ड टिमच्या माध्यमातून सात दिवसांमध्ये 150 पेक्षा अधिक रुग्णांना मदत; माेरया फाऊंडेशनचे अध्यक्ष केतन खाेरे यांचा पुढाकार
देवळाली प्रवरामध्ये रॅपिड पथकाकडून घराेघरी काेराेना चाचणी; मुख्याधिकारी अजित निकत आणि नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या पुढाकारातून नगरपालिकेचा उपक्रम
जादा दराने खत विक्री केल्यास विक्रेत्यांवर कारवाई; जिल्हा परिषदेकडून तक्रारीसाठी 0241-2353693 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन
हातात दाेन तलवारी घेऊन फिरणाऱ्या युवकाला अटक; साईनगर येथे श्रीरामपूर पाेलिसांनी युवकाला पाठलाग करून पकडले
जिल्ह्यात पुढचे पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार; महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा अंदाज
म्युकाेरमायकाॅसिस आजारामुळे कर्जतमधील एकाचा मृत्यू; मिरजगावमधील 35 वर्षीय तरुणाला काेराेना संसर्गानंतर झाला हाेता आजार
अहमदनगर जिल्ह्यात घरफाेड्या करणाऱ्या साेलापूरच्या करमाळ्यातील तिघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तिघांकडून चाेरीचा मुद्देमाल हस्तगत
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण; ताैते चक्रीवादळाचा परिणाम असल्याचा स्थानिक हवामान अभ्यासकांचा दावा