तलाठ्याला शेतकऱ्यांना केली मारहाण, या तालुक्यातील गावातील घटना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 21 मे,शुक्रवार
तलाठ्याला मारहाणीची घटना करणे हे खरोखरच चुकीचे झालेली आहे.
समाजामध्ये अनेकदा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या घटना घडताना दिसतात. या आधीही अहमदनगर जिल्ह्यात असे प्रकार घडले आहेत.
अनेकदा यावर कडक कायद्याचा धाक दाखवूनही असे प्रकरणे अद्यापही कमीअधिक प्रमाणात सुरु असल्याचे चित्र आहे. आता राहुरी तालुक्यातील मानोरी येथील तलाठ्यास मारहाण करण्यात आली आहे.
याप्रकरणी मानोरी येथील तलाठी राहुल राजकुमार कराड यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार वसंत आढाव, वैभव आढाव या दोघांविरोधात भा.दं.वि कलम-353, 332, 504, 506, 188, 269, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी: फिर्यादीत म्हटल्यानुसार, आरोपी वसंत आढाव, वैभव आढाव, दोघे राहणार मानोरी यांनी गुरूवारी दुपारी तलाठी कार्यालयात येऊन गट नंबर 188/अ या गटावरील शर्त खरेदी फेरफार नं. 846 हा मला कमी कर द्या असे म्हणाले.
त्यांना फिर्यादी तलाठी कराड म्हणाले की सदर फेरफार हा मुळात रद्द असल्याने कमी करण्याचा प्रश्न उदभवत नाही. तसेच तशी ऑनलाईन ई फेरफार प्राणाली मध्ये सुविधा देखील उपलब्ध नाही,
असे समजावुन सांगत असताना त्याचा राग येवुन आरोपी यांनी शिवीगाळ करून गंचाडी धरून मारहाण केली तसेच टेबल वरील लॅपटॉप व प्रिटर यांचे देखील नुकसान केले.
तसेच पोलिसात तक्रार केली तर तुमच्या विरूध्द अॅट्रोसिटी दाखल करील अशी धमकी देखील दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.