पाथर्डी- वृद्धेश्वर देवस्थानकडे देवराई मार्गाने जाणारा रस्ता दुरुस्त करा.
पाथर्डी - नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र वृद्धेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी, अशी मागणी भाविकांकडून करण्यात येऊ लागली आहे. श्रावण महिना सुरु झाला असून अनेक भाविक वृद्धेश्वर मंदिर जरी बंद असले तरी मंदिराच्या बाहेरूनच श्री वृद्धेश्वराचे दर्शन घेण्यासाठी श्रावण महिन्याचे निमित्त साधून दररोज वृद्धेश्वरला येत आहेत. परंतु गेल्या काही दिवसापासून या रस्त्याची झालेली दुरवस्था याचा मोठा संताप भाविकांकडून व्यक्त केला जात आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून देवराईपासून पुढे वृद्धेश्वरपर्यंत हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होणे फार महत्त्वाचे आहे.