कासार पिंपळगावात विद्युत मोटारची चोरी
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे इलेक्ट्रिक पाणबुडी मोटारची चोरी झाली आहे.या प्रकरणी प्रतिभा एकनाथ चितळे यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीनुसार ९ सप्टेंबर रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.चितळे यांच्या विहीरीवरील पाच हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रिक मोटार चोरट्यानी चोरून नेली.ही मोटार १० एचपीची होती.पुढील तपास स.फौ. तांबे हे करत आहेत.