महाराष्ट्र
2017
10
इंदुरीकर महाराजावर भाजपच्या 'या' नेत्या भडकल्या
By Admin
इंदुरीकर महाराजावर भाजपच्या 'या' नेत्या भडकल्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कीर्तनकार निवृत्त इंदुरीकरांवर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या आहेत. 'सत्तेतील बेलगाम घोड्यांना हत्ती म्हणत बळ देऊन महिलांना छळायची शिकवण देताय का?' असा सावल वाघ यांनी इंदुरीकरांचे नाव न घेता केला आहे. वाघ यांनी यासंदर्भात ट्विट केले असून, ते सध्या चर्चेत आहे.
लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून पारनेरच्या तहसीलदार ज्याेती देवरे यांनी आत्महत्या करण्याचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप तयार केली होती. नंतर ती समाज माध्यमांतून व्हायरल झाली. देवरे यांनी थेट काेणाचेही नाव घेतले नसले, तरी त्यांचा राेख सर्वश्रूत पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्याकडे आहे. आमदार लंके यांनीदेखील देवरे यांचे आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणात सुरवातीपासून वाघ यांनी देवरे यांची बाजू लावून धरली आहे. महिला म्हणून त्यांना त्रास होता कामा नये, अशी त्यांची भूमिका आहे.
लंके यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह झाला. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे या सेंटरमध्ये नुकताच कीर्तन झाले. कीर्तनातून त्यांनी आमदार लंके यांचे कौतुक केले. इंदुरीकर यांनी 'हत्ती गावात आला की त्याच्यावर कुत्री भुंकत असतात. परंतु हत्ती आपली चाल बदलत नाही तो ध्येयाकडे चालत राहतो. त्यामुळे लंके तुमच्यावर कोणी कुत्री भुंकत असली तर तुम्ही त्याकडे लक्ष ने देता तुमची यशाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल सोडू नका,' असे म्हटले हाेते. इंदुरीकर यांच्या याच टिपणीवर चित्रा वाघ चिडल्या आहेत. वाघ यांनी त्याअनुषंगाने एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी इंदुरीकरण यांचे नाव घेतलेले नाही. 'राज्यातील भोळ्या भाबड्या भगिनी मन लाऊन ज्यांचे कीर्तन ऐकतात त्या हभपनी एका महिलेचीचं प्रशासकीय तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीकडून होणाऱ्या त्रासाची तुलना 'कुत्री भुंकतात' अशी करणं अतिशय दुदैवी... या सत्तेतील बेलगाम घोड्यांना 'हत्ती' म्हणतं बळ देऊन महिलांना छळायची शिकवण देताय का?' असे वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Tags :

