तनपुरे सहकारी कारखान्यावर खासदार विखेंनी उपोषणस्थळी भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची केली विनंती
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील तनपुरे सहकारी कारखान्याच्या कार्यस्थळावर कामगारांच्या विविध प्रश्नांवर सुरू असलेल्या उपोषणस्थळी खासदार डॉ. सुजय विखे व माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र चर्चेअंती तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलन सातव्या दिवशीही सुरू होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस, माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
‘आमच्या काळातील देणी देण्यासाठी आम्ही बाधिल आहोत. पाच वर्षात अडीच वर्षं कारखाना चालवताना अनंत अडचणींना संचालक मंडळ सामोरे गेले. मागील १२ कोटी रुपयांचे उसाचे थकीत देणे दिली. जिल्हा बॅंकेचे देणे काही प्रमाणात मिटवले. आता देखील कारखान्याच्या मालकीच्या जमिनी विक्रीसाठी परवानगी मागितली आहे. आमच्या वर विश्वास ठेवा, व आंदोलन मागे घ्या, अशी विनंती आंदोलकांना खासदार डॉ.विखे यांनी केली.
तर, आमच्या मागण्या पुर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे कामगार प्रतिनिधी इंद्रभान पेरणे यांनी स्पष्ट केले.