Breaking-पाच वर्षाच्या चिमुरड्याचा निर्घृण खून केल्याची 'या' तालुक्यातील घटना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाच वर्षाच्या चिमुरड्याचा निर्घृण खून झाल्याची घटना समोर आली आहे.
अहमदनगरमधून अनेक गुन्हेगारी घटना वारंवार समोर येत असतात. जिल्ह्यात चोरी, दरोडे , खुनासारख्या घटना वाढीस लागलेल्या दिसतात. आता एक खळबळजनक वृत्त आले आहे.
धक्कादायक म्हणजे हा खून आजोबानेच केल्याचे समजते आहे.
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील तीन चारी वस्ती येथे सदर प्रकार घडला. या प्रकरणाने आजोबांच्या नात्याला काळीमा लागला गेला आहे.
निर्दयी आजोबाने आपल्या पाच वर्षाच्या नातवाचा जीव घेतल्याची घटना कोपरगाव तालुक्यात घडली आहे. आई-वडील संभाळत नाही म्हणून आजोबाकडे असलेल्या नातवाचा ६० वर्षीय आजोबाने गुरुवारी रात्री निर्घुण खून केला.
गावातील अज्ञात व्यक्तीने पोलीस स्टेशनला करून सदर घटनेची माहिती दिली. त्यानुसार गोदावरी नदी काठी पुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून सदर आरोपीने गुन्हा कबूल केला आहे.
पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
लहान मुलं आई वडीलांपेक्षा जास्त आपल्या आजी-आजोबांच्या मांडीवर खेळताना दिसतात. मात्र या घटनेने या नात्यास काळिमा लागला गेला आहे.