अधिकारांचा वापर समाजाच्या हितासाठी करावा- प्रकाश औसरमल
कोरडगाव येथे बँक शाखाधिकारी प्रकाश औसरमल यांचा सेवापूर्ती निमीत्त सत्कार
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील रहिवासी, अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव बँक शाखा कोरडगावचे शाखाधिकारी प्रकाश औसरमल हे नुकतेच प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्याने सेवापुर्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कोरडगाव येथील त्यांच्या सेवापुर्ती सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार समारंभाच्यावेळी औसरमल म्हणाले, अधिकारांचा वापर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी केल्यास, या कार्याची दखल समाज घेत असतो. नोकरी करत असतांना शासनाने विविध अधिकार प्रदान केले असतात. परंतु सदर अधिकारांचा वापर समाजाच्या हितासाठी असतो, याचे भान ठेवून नोकरीत आपल्या विभागा संदर्भात जनतेचे प्रश्न सोडवून, सहकार्य करून, मार्ग काढून प्रश्न मार्गी लावणे महत्त्वाचे असते. या कार्याची दखल जनता नक्कीच घेत असते.
यावेळी औसरमल यांच्या सेवापुर्ती निमित्त विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांना मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, पुष्पहाराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मार्केट कमिटीचे संचालक मधुकर देशमुख, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक नारायण काकडे, चेअरमन बाळासाहेब घुले, चेअरमन संतराम वारंगुळे, भाजपा कार्यालय प्रमुख दादासाहेब येढे, कवी अर्जुन देशमुख, डॉ. तुपेरे, रमेश जोशी, शिवाजी बोंद्रे तसेच सचिव प्रभाकर देशमुख, पंडित देशमुख, जयदेव घुले, प्रमोद काकडे, किशोर देशमुख, त्र्यंबक देशमुख, बंडू पठाडे, भाऊसाहेब काकडे आदी उपस्थित होते.
दरम्यान येथील साई क्लिनिक चे डॉ. संतोष तुपेरे यांनी औसरमल यांचा सत्कार करून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.