नायब तहसिलदार यांच्या वाहनाचा अपघात;मोटरसायकल स्वार गंभीर जखमी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
निवडणूक नायब तहसीलदार संजय माळी यांच्या वाहनाचा माळीबाभूळगाव शिवरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघात
नायब तहसीलदार संजय माळी यांच्या वाहनाचा माळीबाभूळगाव शिवरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास अपघात झाला;दरम्यान या अपघातात तहसीलदार यांना कुठलीही इजा झाली नसून मोटरसायकलस्वार मात्र गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी त्याला उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते.
याबाबत प्राथमिक समजलेली अधिक माहिती अशी की,निवडणूक नायब तहसीलदार संजय माळी हे पाथर्डी-अहमदनगर असा नियमित प्रवास करत असतात. सोमवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास आपल्या कार्यालयातील कामकाज करून आपल्या होंडा कंपनीच्या वाहनातून नगरच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या यमा एफ झेड या मोटरसायकलचा व त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.यामध्ये एम एच ४३ बी व्ही ९७२६ यावरील बाईकस्वार गंभीर जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.