नवनिर्वाचित संचालकांनी बँकेचा कारभार पारदर्शक करावा- दिगंबर गाडे
प्राथमिक शिक्षक बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार
पाथर्डी- प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षक बँकेचे नवनिर्वाचित संचालक पाथर्डी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड, ज्ञानेश्वर शिरसाट व कल्याणराव लवांडे यांचा नुकतेच पाथर्डी शहरातील राज्यश्री शाहू महाराज शासकीय कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्कार समारंभाचे आयोजन पाथर्डी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे करण्यात आले होते.
यावेळी पतसंस्थेचे चेअरमन दिगंबर गाडे म्हणाले की, निवडून आलेल्या संचालकांनी पारदर्शक कारभार करून संस्थेचा नाव लौकीक वाढवावा. प्राथमिक शिक्षक बँकेला खूप मोठा इतिहास आहे. त्याला अनुसरून संचालकांनी काम करावे व बँकेचा कारभार पारदर्शक करावा, असे प्रतिपादन शाहू महाराज पथ संस्थेचे चेअरमन दिगंबर गाडे यांनी केले.
या प्रसंगी नगरसेवक बंडू पा.बोरुडे, सुरेश मिसाळ, सिताराम बापू बोरुडे, दिलीप तिजोरे, हुमायुन आतार, अरुण रोकडे, संपत घारे, संदीप उदमले, संदीप भागवत, महेंद्र राजगुरू, समाधान आराख, विजय गर्जे, शहादेव काळे, रामकिसन वाघ, विकास सातपुते, ईश्वर गायकवाड आदिंसह कार्यकर्ते उपस्थीत होते.
वसंतराव बोर्डे गुरुजी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.