महाराष्ट्र
पाथर्डी- युवकाचा खून करून पळालेले 10 जण 12 तासात पकडले; पोलिसांचा थरारक पाठलाग नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी पाथर्डी तालुक्यातील देवराई येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणुकीमध्ये दोन गटामध्ये झालेल्या तुंबळ मारहाणीत एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.या संदर्भात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा करण्यात आला आहे. यात 10 आरोपींना 12 तासांचे 8 पकडण्यात यश आले, असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.या संदर्भात सुनिल एकनाथ पालवे , संतोष रामदास पालवे, अंबादास सदाशिव पालवे, संजय विष्णु कारखेले, आकाश संजय पालवे, सविता अनिल पालवे, अनिल एकनाथ पालवे, दिनकरराव सावळेराम पालवे, दिनकरराव सावळेराम पालवे यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. बाळासाहेब नवनाथ पालवे (रा. देवराई) यांनी तक्रार दिली आहे. शनिवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास विजयी पॅनल बालाजी शेतकरी विकास मंडळ पॅनलतर्फे साउंड सिस्टम लावून मिरवणूक चालू होती. त्यावेळी 15 ते 20 लोकांनी देवराई विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणुकांमध्ये पराभूत झाल्याच्या कारणावरून पूर्वतयारीने त्यांच्यावर अचानकपणे तलवार, सुरा, लोखंडी कुऱ्हाड,