महाराष्ट्र
शेततळ्यात बुडून सख्या बहिण भावाचा मृत्यू; पाणी काढण्यासाठी गेले शेततळ्यात
By Admin
शेततळ्यात बुडून सख्या बहिण भावाचा मृत्यू; पाणी काढण्यासाठी गेले शेततळ्यात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेततळ्यात बुडून सख्या बहिण भावाचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मोधळवाडीच्या घाणेवस्ती येथे घी घटना घडली.
जयश्री बबन शिंदे (वय 21 ) आणि आयुष बबन शिंदे (वय 7 ) अशी मृत बहिण भावाची नावे आहेत. शेततळ्यातून पाणी काढताना पाय घसरल्याने आयुष शेततळ्यात पडला. भावाला वाचवण्यासाठी बहिण जयश्रीने शेततळ्यात ऊडी घेतली. परंतु, दुर्देवाने यात दोघांचाही मृत्यू झाला.
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील पिंपळगाव देपा गावा अंतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे रविवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे बबन चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासोबत राहातात. रविवारी सकाळी मुलगी जयश्री व मुलगा आयुष हे दोघे बहीण भाऊ कपडे धुण्यासाठी आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर गेले होते. आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला. भाऊ शेततळ्यात पडला त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी बहीण जयश्री हिने मागचा पुढचा विचार न करता शेततळ्यात उडी मारली. मात्र, दोघेही खोल असलेल्या शेततळ्यातील पाण्यात बुडाले.
जयश्री आणि आयुष शेततळ्यात बुडाल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांनाही शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र, त्या अगोदरच दोघांचाही मृत्यू झाला होता. दोघांचेही मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात नेण्यात आले. बहीण भावाच्या दुर्दैवी मृत्यूने पिंपळगाव देपा गावासह पठारभागावर शोककळा पसरली आहे.
जयश्री आणि आयुष या दोन्ही बहीण भावाचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता. त्यामुळे त्यांच्या दृर्दैवी मृत्यूने मोधळवाडी, पिंपळगाव देपा ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली असून अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
मागील काही दिवसांत शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकत आहोत. याच पार्श्वभामीवर अहमदनगर जिल्ह्यांमधून एक घटना समोर आली आहे. शेततळ्यातून पाणी काढण्यासाठी गेलेल्या सख्या बहिण-भावाचा तळ्यात बुडून मृत्यू झाला.
Tags :
29522
10