कवडदरा विद्यालयात वृक्षारोपण
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेजमध्ये सामाजिक वनीकरण विभागा मार्फत १०० वन रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
मातीची धूप रोखणे व जमिनीतील आद्रता मान्सून पश्चातही टिकून राहावी यासाठी वृक्ष लागवड गरजेची आहे. विद्यालय परीसरात केलेली वन रोपाची लागवड चांगल्या पद्धतीने केली आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत विद्यालयासाठी* आणखी वृक्ष रोपे देण्यासाठी प्रयत्नशीलआहे.
असे यावेळी वनपरीक्षेञ अधिकारी निलेश सरोदे यांनी सांगितले.
यावेळी सामाजिक वनीकरण वन परीक्षेञ अधिकारी एच.आर.चौधरी, निलेश सरोदे , प्राचार्य व्ही.एम.कांबळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.