महाराष्ट्र
भालगावची कन्या डाॅ. पुजा खेडकरचे युपीएससी परीक्षेत घवघवीत यश
By Admin
भालगावची कन्या डाॅ. पुजा खेडकरचे युपीएससी परीक्षेत घवघवीत यश
पूजा खेडकर ने आजोबा (आयएएस) चे स्वप्न पूर्ण
पाथर्डी- प्रतिनिधी
देशाची पहिली आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा निकाल सोमवारी (३० मे) जाहीर झाला. यात पाथर्डी तालुक्यातील भालगावची कन्या एमएस (सर्जन) असलेल्या पूजा खेडकर हिने यात बाजी मारली आहे.
भालगाव च्या लोकनियुक्त सरपंच डाॅ.मनोरमा खेडकर आणि भालगावचे सुपुत्र दिलीपराव खेडकर (प्रदुषण आयुक्त) यांची कन्या डाॅ. पुजा दिलीपराव खेडकर हिने ३० मे रोजी जाहीर झालेले भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा -२०२१ या परीक्षेत अत्यंत नेञदिपक यश संपादन केले. या परीक्षेस बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांमधुन डाॅ. पुजा हिने ६७९ वा क्रमांक पटकावत घवघवीत यश मिळवले. युपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेमधुन भारतीय प्रशासकीय सेवा (आयए एस) भारतीय पोलीस सेवा ( आयपीएस ), भारतीय परकीय सेवा ( आयएफएस) भारतीय महसूल सेवा( आयआर एस) या सारख्या सेवेतील सर्वोच्च पदावर काम करणा-या अधिकाऱ्याची निवड केली जाते. ही परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात येते. यातील पहील्या टप्प्यात प्रीलीमरी परीक्षा म्हणजेच चाळणी परीक्षा होते. या मध्ये लाखो विद्यार्थ्यांमधुन एकुण जागेच्या मेरीटनुसार १० ते १५ पट मुले मुख्य लेखी परीक्षेसाठी निवडले जातात. मुख्य परीक्षेमधुन एकुण जागेच्या मेरीट नुसार तीन ते चार पट मुलाची मुलाखतीसाठी निवड होते आणि मुलाखती मधुन गणवत्तेनुसार फायनल लिस्ट तयार केली जाते.
सन २०२१ मध्ये झालेली युपीएससीची ही परीक्षा एकुण ९४८ जागांसाठी घेण्यात आली होती. त्यापैकी ६८५ जागेचा निकाल जाहीर झाला असुन उर्वरित जागेचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. निकाल जाहीर झालेल्या या जागेत डाॅ. पुजा हिचा देशात ६७९ वा क्रमांक असुन महाराष्ट्रातुन या वर्षी निवड होणारी ती एकमेव मुलगी आहे. डाॅ. पुजा यांनी दिलेल्या पंसत क्रमांक नुसार त्यांना आयएएस ही सर्व्हिस आणि महाराष्ट्र केडर मिळण्याची त्यांना खाञी आहे.
डॉ. पुजा यांनी त्यांचे अजोबा स्व. जगन्नाथराव पंढरीनाथ बुधवंत (आयएएस) यांच्या पासून जिल्हाधिकारी होण्याची प्रेरणा घेतली असुन आपल्या नातीने आपल्या नंतर आयएएस व्हावे, अशी त्यांचीही तीव्र इच्छा होती. त्यानुसार तिने आपल्या अजोबाचे आणि सर्व कुटुंबीयाचे स्वप्न पुर्ण केले.
डाॅ. पुजा यांनी एमबीबीएस , एमएस (सर्जन) असे शिक्षण पुर्ण केले असून, या परीक्षेच्या तयारीसाठी त्या दिल्ली येथे अभ्यास करत होत्या. डाॅ. पुजा यांचे युपीएससी परीक्षेमधुनच मागील वर्षी स्पोर्ट्स ॲथाॅरीटी ऑफ इंडिया मधील सहाय्यक संचालक या पदी निवड झालेली असून त्या सध्या दिल्ली येथे कार्यरत आहेत.
डॉ. पुजा यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशासाठी त्यांचे सर्व स्तरांमधून कौतुक होत असून भालगाव गावासाठी डाॅ. पुजा आयएएस होणे फार कौतुकाचा विषय आहे.
Tags :
74655
10