महाराष्ट्र
पाथर्डी लायन्स क्लबचे कार्य अभिमानास्पद- ला.प्रविण गुलाटी
By Admin
पाथर्डी लायन्स क्लबचे कार्य अभिमानास्पद- ला.प्रविण गुलाटी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
लायन्स क्लब पाथर्डी पदग्रहण सोहळा २०२२-२३ संपन्न.
क्लब स्थापनेपासून सामाजिक भान ठेऊन गेल्या पाच वर्षांत पाथर्डी लायन्स क्लबने राबविलेले उपक्रम लायन्स इंटरनॕशनलसाठी अभिमानास्पद आहे..असे गौरवोद्गार लायन्स क्लब पाथर्डी २०२२-२३ च्या नूतन पदाधिकारी पदग्रहण समारंभावेळी पास्ट केबिनेट ट्रेझरर ला.प्रविण गुलाटी यांनी काढले..
दरवर्षीप्रमाणे याही वेळी क्लबचा नुतन पदाधिकारी पदग्रहण सोहळा दिमाखात पार पडला..सन२०२१-२२ चे प्रेसिडेंट ला.डाॕ.हर्षल चितळे व सेक्रेटरी ला.डाॕ.राहूल देशमुख यांनी पाहूण्यांचे स्वागत केले व मागिल वर्षीचा लेखाजोखा मांडला.. तदनंतर क्लबची ध्वजवंदना ला.डाॅ.संदीप पवार यांचे हस्ते पार पडली.
सन२०२२-२३ ला.राहूल मोरे यांची प्रेसिडेंट पदी ला.डाॅ.संदीप पवार यांची सेक्रेटरी पदी, ला.गणेश भागवत यांची ट्रेझरर पदी तसेच इतर सभासदांची विविध पदावर सर्वांच्या संमतीने निवड झाली..
पदाधिकाऱ्यांचा शपथविधी इंस्टाॕलेशन आॕफिसर ला.प्रविणजी गुलाटी यांचे हस्ते पार पडला.. कार्यक्रमावेळी आबासाहेब काकडे वसतीगृहाचे अधिक्षक वरखेडकर दांपत्याचा अविरत सेवेसाठी सत्कार करण्यात आला.. काकडे वसतीगृह व तिलोक जैन वसतीगृहामधील मुलांना विविध प्रकारच्या खेळाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
रिजन चेअरपर्सन ला.सुनील साठे यांनी इंटरनॅशनल क्लबच्या मार्गदर्शनाने वर्षभर राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली..
नूतन सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते पार पडला.
सत्कारावेळी बोलताना नूतन प्रेसिडेंट ला.राहूल मोरे यांनी आगामी वर्षात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली विशेष करून माऊथ कॅंसरच्या जागृती साठी व्यापक स्वरूपात राबविणाऱ्या मोहिमेची माहिती दिली.
कार्यक्रमासाठी क्लबचे मार्गदर्शक ला.डाॕ.ललितजी गुगळे, कॅबिनेट आॕफिसर ला.ए.आय खैरे,ला.डाॕ.भाऊसाहेब लांडे,ला.डाॕ.सलमान शेख, पत्रकार अॕड.हरिहर गर्जे,ला.प्रमोद दहिफळे,ला.प्रविण बोडखे,मा.आबा लांडे,श्री.रावसाहेब मोरे सर,श्री.शेख सर,डाॅ.शिरीष जोशी,श्री.आकाश पवार इत्यादी कुटुंबासमवेत उपस्थित होते.
सुत्रसंचालन ला.भाऊसाहेब गोरेंनी केले व ला.राजेश काळे यांनी आभार मानले.
Tags :
83756
10