महाराष्ट्र
ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर! शेवगावात 'या' 12 ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक
By Admin
ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर! शेवगाव तालुक्यातील 'या' 12 ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील मुदत संपलेल्या 12 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची निवड करण्यात येणार असून, या संस्थांच्या निवडणुका थेट पुढील वर्षीच होण्याची शक्यता आहे.
कोरोना आजाराने शासनाचे निर्बंध, तसेच सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या विविध रिट याचिकांमुळे जानेवारी 2021 ते स्पटेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायत निवडणुका टप्या टप्प्याने घेण्यात आल्या. आता राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्या सुमारे 7 हजार 649, नवनिर्मित 8, तसेच मागील निवडणुकीत समर्पित आयोग अहवालात दिसत नसणार्या 18 अशा 7 हजार 675 ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत.
या निवडणुकीस प्रभाग रचनानंतर मतदारयाद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणुका, यासाठी सुमारे दोन-तीन महिन्यांचा कालावधी आवश्यक असल्याने त्याचे नियोजन आयोगाच्या स्तरावर करण्यात ये त आहे. त्यामुळे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्या ग्रामपंचायत निवडणुका वेळेत घेण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या जशा मुदती संपतील तशा त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत.
नगर जिल्ह्यात ऑक्टोबर 134 व नाव्हेंबर 70 अशा मुदत संपणार्या 204 ग्रामपंचायती आहेत. शेवगाव तालुक्यात 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2022 मध्य मुदत संपणार्या 13 ग्रामपंचायती आहेत. पैकी विजयपूर ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे.
जशा मुदती संपतील तसे या ग्रामपंचायतीवर प्रशासकांची निवड होणार असुन त्यानंतर निवडणुका होऊन सरपंच निवडी होतील त्यावेळी प्रशासक राज संपणार आहे. प्रशासक म्हणुन विस्तार अधिकारी यांच्या निवडी होण्याची शक्यता आहे.
मुदत संपणार्या ग्रामपंचायती
खामगाव, प्रभूवाडगाव, रांजणी, सुलतानपूर खुर्द, ग्रामपंचायतींची मुदत 10 नाव्हेंबर रोजी संपत आहे.तर अमरापुर, दहिगाव ने, भायगाव, जोहरापुर, खानापुर, वाघोली, आखेगाव, कुरुडगाव रावतळे ग्रामपंचायतीच्या मुदती 25 नोव्हेंबर रोजी संपणार आहेत.
Tags :
791
10