महाराष्ट्र
शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांचा ४७ अभिष्टचिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रमाने साजरा
By Admin
शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांचा ४७ अभिष्टचिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रमाने साजरा
पाथर्डी- प्रतिनिधी
राष्ट्रीय शेतकरी युनीयन अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा भाजपा किसान मोर्चाचे अहमदनगर दक्षिणचे सरचिटणीस शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांचा वाढदिवस नुकताच विविध सामाजीक उपक्रमाने साजरा करण्यात आला
शेतकरीनेते ढाकणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमीत्त मढी करडवाडी येथील श्रीकृष्ण गोशाळेतील गोमातेस गुळाचा गोड घास खाऊ घालण्यात अला यावेळी श्रीकृष्ण गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष ह. भ. दिपक महाराज काळे यांनी शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांचा सम्मान केला. दिपक महाराज काळे म्हणाले की, हल्ली वाढदिवस म्हटले की पारट्या, डिजे , प्लेक्स बोर्डवर अनेक जण खर्च करतात पण आमचे मित्र बाळासाहेब ढाकणे हे सांप्रादायीक व संस्कारीत असल्यामुळे ते आपला वाढदिवस नेहमीच सामाजीक उपक्रमाने दरवर्षी श्रीकृष्ण गोशाळेत साजरा करतात तसेच त्यांचे शेतकऱ्यांविषयीचे योगदान खुप मोठे आहे त्यांना त्यांनी मनी धरलेल्या कार्याला यश मिळो असा आशिर्वाद दिला व त्यांच्या सामजीक उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले व शेतकरी नेते ढाकणे यांचा आदर्श वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी यापुढे घ्यावा व आपले वाढदिवस गोशाळेत साजरे करावेत असे अवाहन केले.
खेर्डे ता. पाथर्डी येथील आदर्श शेतकरी कारभारी दशरथ सांगळे यांनी दुष्काळात पडिक जमिनीमध्ये डोक्यावर पाणी आणुन बोरीचे उत्तम पिक घेतल्यामुळे त्यांच्या घरी जाऊन आदर्श शेतकरी कारभारी सांगळे यांचा शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी राष्ट्रीय शेतकरी युनीयनच्या वतीने सम्मान केला.
दैत्यनांदुर येथे युवा सामाजीक कार्यकर्ते आजीनाथ दहिफळे हे अनेक वर्षापासुन अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपण व मोफत क्लास घेतात.
त्या अनाय मुलांना शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी आपल्या अभिष्टचिंतन सोहळया निमीत्त शालेय साहित्य व मिठाई वाटप करुन चिमुकल्या बरोबर आपला वाढदिवस साजरा केला.
दैत्यनांदुर येथील अभिष्टचिंतन कार्यक्रमात शेतकरी नेते ढाकणे म्हणाले की जीवन जगत आसताना प्रत्येकाने आपली सामाजिक बांधीलकी जोपासली पाहिजे.हल्ली प्रत्येक जण आपली सामाजीक बांधीलकी विसरून आपल्या कुटुंबा पुरता मर्यादीत जीवन जगु राहिला. साधुसंत व आई वडीलांच्या आशिर्वादाने मी सामाजीक बांधीलकी जपतोय व प्रत्येकानी ती जपावी व अनाथ, कष्टकरी, व प्रत्येक माणसात देव पाहवा असे अहवान या वेळी त्यांनी आपल्या अभिष्टचिंतन कार्यक्रमाद्वारे समाजाला केले. यावेळी या चिमुकल्यांच्या सहवासात माझा वाढदिवस साजरा करताना माझा आनंद द्विगुणीक झाला व चिमुकल्यांंमध्येच मला देव भेटला आसे सांगुन अभिष्टचिंतन सोहळ्यानंतर ढाकणे हे चिमुकल्यामध्ये रमुन गेल्यामुळे चिमुकल्यांनाही आपल्या जवळचे कोणी तरी आपणास जवळ घेत आहे म्हणुन आनंद झाला.
यावेळी सामाजीक कार्येकर्ते आजीनाथ दहिफळे यांनी शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सपत्नीक सम्मान केला व आभार मानले.
शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमीत्त राबविलेल्या समाजीक उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे व शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांचे समाजाकडून तोंडभरून कौतुक होत आहे.
Tags :
24891
10