चितळी गाव विजे अभावी अंधारात ; वीज गायब झाल्याने जनजीवन विस्कळीत
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील चितळी,पाडळी,ढवळेवाडी या परीसरातील गावात गेल्या आठवडाभरापासून वीज गायब झाली आहे.वीजेचा खेळ खंडोबा झाला असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गावाला कोणीही वायरमन उपलब्ध नसून रीक्त जागी कोणीच महावितरणचा कर्मचारी नाही. गेल्या आठ दिवसापासून शेतातील शेतीपंपाची वीजही गायब झाली असून शेतातील पिकांना पाणी देता आलेले नाही.काही प्रमाणात झालेल्या पाऊसावरच ही पिके तग धरुन आहेत.जनावरांच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर असून शेतकऱ्यांना विहीरीतून पाणी शेदूंन आणून तसेच विकतचे पाणी घेऊन जनावराची तहान भागावी लागत आहे.नागरिकांना पाणी जारचे विकतचे पाणी प्यावे लागत आहेत. सर्वांना पाण्याची अडचण आहे. गावातील लोकांसाठी असणारी सिंगल फेज लाईट कधी पण येत-जात आहे. तसेच अवेळी रात्री लाईट गेली तर पुन्हा सकाळपर्यंत येत नाही.
शाळकरी मुलांला घरातील वीज गायब झाल्याने अभ्यास करता येत नसून शैक्षणिक नुकसान होत आहे.
गेली आठ-दहा दिवसांपासून चितळी, पाडळी आणि ढवळेवाडी कायम अंधारात आहे.येत्या दोन दिवसात यावर काही निर्णय झाला नाही चितळी-तिसगाव रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. महावितरण कंपनीचे वायरमन यांना संपर्क साधला असता 'मी आजारी असल्याचे कारण सांगितले जात आहे.तसेच संबंधित कार्यकारी अधिकारी श्री. ठाकूर सर यांना वारंवार फोन करूनही त्याच्या प्रतिसाद दिसुन येत नाही.
असे चितळी गावातील उप सरपंच संतोष कदम यांनी सांगितले.
विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असून लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत होईल. या भागातील वायरमन कर्मचारी संख्या कमी असल्याने वीज सुरळीत सुरू करण्यात अडचणी येत आहे.
महावितरण अधिकारी
ठाकूर साहेब