पाथर्डी- माजी सैनिकांच्या विवाहीत मुलीला गळफास देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील माजी सैनिक आदिनाथ बाळदेव केळकर यांच्या विवाहीत मुलीला गळफास देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.कासार पिंपळगावच्या सरपंच व प्रहार कल्याण संघ माजी सैनिक संघटना तसेच आई वडील तसेच नातेवाईक सर्व ग्रामस्थाच्या वतीने विनंती निवेदन पोलिसांनी देण्यात आले.यासंबंधी धिरज बाबासाहेब रांधवणे, बाबासाहेब फक्कडराव रांधवणे,सौ.सुनिता बाबासाहेब रांधवणे,सुरज बाबासाहेब रांधवणे हे घटनास्थळी उपस्थित होते.यांनी पिडीत तेजश्री धिरज रांधवणे हिस गळफास देवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच मारण्याचे कारण हुंडाबळी असून चारचाकी गाडीसाठी माहेरून पैशाची मागणी तसेच पैसे न आणल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असून संबंधित व्यक्तीवर तात्काळ ३०७ गुन्हा दाखल करावा.तसेच दुर्दैवाने पिडीताचा मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीवर ३०२ हे कलम लावण्यात यावे.तसेच कारवाई करावी.अशा माहीतीचे निवेदन माजी सैनिक बांधव तसेच अहमदनगर जिल्हा माजी सैनिक संघटना यांच्या वतीने पाथर्डी पोलिसांना देण्यात आले.पिडीत तरुणीला न्याय मिळावा अशी अपेक्षा माजी सैनिक, पिडीतेचे आई वडील नातेवाईकांनी पोलिसांना केली.
खूपच दुर्दैवी घटना तातडीने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन गुन्हा दाखल करावा.
अन्यथा कारवाई न केल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.यावेळी या प्रहार संघटनेच्या पञावर माजी सैनिक संघटनेचे विनोद सिंग परदेशी, राहुल पाटोळे, पोपट कापसे,अंबादास गुन्नदगड,अमोल खरपुडे,पोपट बेल्हेकर,सदाशिव बेल्हेकर,संकेत बेल्हेकर,शंकर बेल्हेकर,राजेंद्र केळकर ,राजेंद्र शिंदे ,सागर बेल्हेकर,रोहित बेल्हेकर,योगेश केळकर,लोकेश बेल्हेकर,नंदू बेल्हेकर,ज्ञानदेव बेल्हेकर यांच्या स्वाक्षरी असून यावेळी वडील आदिनाथ केळकर तसेच माजी सैनिक,ग्रामस्थ उपस्थित होते.