युवा उद्योजक गोकुळ आंधळे यांना २०२२ चा युवा उद्योजक पुरस्कार प्रदान
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील लांडकवाडी येथील सुपुत्र संजीवनी फाउंडेशन जिल्हाध्यक्ष युवा उद्योजक गोकुळ आंधळे यांना शिवछत्रपती संजीवनी युवा उद्योजक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
युवा उद्योजक गोकुळ आंधळे यांना संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने संगमनेर येथे झालेल्या शिवछत्रपती गुणीजन गौरव महासंमेलन राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२२ या कार्यक्रमात शिवछत्रपती महाराष्ट्र राज्यस्तरीय युवा उद्योजक २०२२ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार त्यांना उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सानप व सचिव गोरक्ष भवर यांचेकडून मानाचा फेटा, पदक, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पं. स. पाथर्डी चे सभापती गोकुळ दौंड, दीपकदादा पाटील, राजश्री थोरात, ज्ञानेश्वर सानप, प्रा. अरुण गायकवाड आदींची उपस्थिती होती.