महाराष्ट्र
241
10
संत चरित्रे संस्कृतीचे प्रेरणा स्तोत्र असतात अशोकानंद कर्डीले
By Admin
संत चरित्रे संस्कृतीचे प्रेरणा स्तोत्र असतात - अशोकानंद कर्डीले
स्व.दादापाटील राजळे जयंती सोहळा - व्याख्यानमाला कार्यक्रम
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील दादापाटील राजळे महाविद्यालयात स्व. दादापाटील राजळे स्मृती व्याख्यान मालेत स्व. दादापाटील राजळे उत्कृष्ट संत साहित्य पुरस्कार 2022, या पुरस्काराचे वितरण पुणे येथील जेष्ठ संत साहित्यिक प्रा.डॉ.तानाजी राऊ पाटील यांना भागवताचार्य अशोकानंद कर्डिले महाराज यांच्या शुभहस्ते वितरित करण्यात आला. त्याप्रसंगी डॉ. पाटील यांनी संत साहित्य हे संस्कृतीचे प्रेरणास्त्रोत असतात. समाजाला विविध अंगाचे चित्रदर्शन संत चरित्रातून घडत असते. असे सांगितले. डॉ. पाटील यांच्या, संत साहित्यातील सामाजिकता, या ग्रंथास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या ग्रंथात त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव यांच्या साहित्यांचा सामाजिक अंगाने अभ्यास केला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे विश्वस्त मा. राहुल दादा राजळे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य डॉ.राजधर टेमकर यांनी केले. स्व. दादापाटील राजळे यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त तालुक्यातील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा व शेतकऱ्यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला. सहकारमहर्षी स्व. दादापाटील राजळे प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी, प्रथम पुरस्कार श्री भीमसेन गोपीनाथ हाडके, सांगवी, द्वितीय पुरस्कार अजिनाथ गिरजा शिरसाठ पिंपळगाव टप्पा, तर तृतीय पुरस्कार आसाराम सिताराम भगत, कासार पिंपळगाव, या शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आला. सहकारमहर्षी स्व. दादा पाटील राजळे प्रगतशील दूध उत्पादक शेतकरी या पुरस्काराचे मानकरी श्री विष्णू बाबुराव चितळे, अशोक राधाकिसन माने, अश्रू शंकर माने, राजेंद्र किसन भडके तसेच सहकारमहर्षी स्व. दादापाटील राजळे उत्कृष्ट फळ उत्पादक शेतकरी हा पुरस्कार शशिकांत भरतराव शिंदे, गणेश पोपटराव चोथे, महादेव यशवंत राजळे यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याचबरोबर स्व. चंद्रभागाबाई दादापाटील राजळे सेवाभावी संस्था या संस्थेच्या वतीने पाथर्डी तालुक्यातून दहावी बारावी तसेच विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातील विद्यावाचस्पती ही उच्च पदवी संपादन करणाऱ्या शिक्षकांचाही सन्मान याप्रसंगी करण्यात आला. याप्रसंगी शिवाजीराव राजळे, राहुलदादा राजळे, अशोकानंद महाराज कर्डिले, प्राचार्य एकनाथराव खांदवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास रामकिसन काकडे, उद्धवराव वाघ, सुभाषराव ताठे, धनंजय पाटील बडे, डॉ.निलेश म्हस्के, शेषराव ढाकणे, शरदराव अकोलकर, बाबासाहेब किलबिले, श्रीकांत मिसाळ, पुरुषोत्तम आठरे, दशरथ खोसे, किशोरजी मरकड, कुशिनाथ बर्डे, जे. आर. पवार, आर. जे. महाजन, बी.आर. गोरे परिसरातील सर्व ऊस, फळे, दूध उत्पादक शेतकरी, विद्यार्थी-विद्यार्थिनी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र इंगळे व प्रा. शामराव गरड यांनी केले.
Tags :

