महाराष्ट्र
बबनराव घोलप म्हणाले, शंकरराव गडाख अपक्ष, त्यांचा शिवसेनेला पाठिंबा
By Admin
बबनराव घोलप म्हणाले, शंकरराव गडाख अपक्ष, त्यांचा शिवसेनेला पाठिंबा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शिवसेनेचे शिर्डीमधील खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात गेले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत लोखंडे यांच्या विरोधात शिवसेना माजी मंत्री बबनराव घोलप यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
अशातच अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांची हकालपट्टी करत त्यांच्या जागी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख म्हणून घोलपांची नियुक्ती करण्यात आली आहे. घोलपांनी काल ( मंगळवारी ) शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीला माजी मंत्री शंकरराव गडाख ( Shankarao Gadakh ) अनुपस्थित होते. ( Babanrao Gholap said, Shankarao Gadakh is independent but he supports us... )
गडाखांच्या अनुपस्थितीवर बबनराव घोलप म्हणाले की, शंकरराव गडाख हे अपक्ष आहेत. त्यांचा शिवसेनेला पाठिंबा मिळाला आहे. ते का आले नाहीत हे आम्हाला माहिती नाही. जे शिवसैनिक आले ते भरपूर होते. एखाद्याची काही अडचण असू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. गडाख यांच्या नेतृत्त्वाखाली मोठ्या संख्येत कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहे. त्यामुळे घोलपांनी केलेल्या वक्तव्यावरून आता गडाखांचा पक्ष कोणता या बाबत उलट-सुलट चर्चा रंगली आहे.
ते पुढे म्हणाले की,शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघात संपर्क प्रमुख म्हणून निवड केली. त्यानुसार कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी मी बैठक बोलावली होती. कार्यकर्त्यांशी मी चर्चा केली. मला समाधान वाटले की, कोणीही फुटलेले नाही. एकसंघ आहेत. त्याचा मला अभिमान वाटतो, असे अभिमानाने त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे. त्यासाठी बैठका लावल्या. कार्यकर्त्यांसाठी आता मोहीम सुरू झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मी कार्यकर्त्यांची मरगळ झटकण्यासाठी आलो आहे. साखर सम्राटही माणसचं आहेत. फक्त त्यांच्याकडे पैसे तर आमच्याकडे निष्ठा जास्त आहे. त्यामुळे काही फरक पडत नाही. साखर सम्राटांना हरविण्या ऐवढी ताकद शिवसैनिकात आहे.
उमेदवारीचे स्वप्न पाहण्यात अर्थ नाही. जे माझ्या पुढे आहे, ती कार्यकर्त्यांची निवडणूक. वेळ आल्यावर ते आव्हान निश्चित पेलवेल. निश्चितच आमदार निवडून आणेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Tags :
465
10