Breaking-'या' तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाची इमारत रुग्णसेवेसाठी आयकॉनिक ठरणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कर्जत उपजिल्हा रुग्णालयाची इमारत आरोग्यसेवेसाठी आयकॉनिक ठरणार असून ती निश्चित मतदारसंघाच्या वैभवात भर घालणारी ठरणार आहे असा आपल्याला विश्वास आहे. या नुतन इमारतीमध्ये नगर-बारामतीसारखे उपचार कर्जत शहरात होतील अशा वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न आ पवार यांनी केले आहे. "जसे पुणे तेथे काय उणे, तसे पवार तेथे विकासाचे काय उणे" या धर्तीवर आ रोहित पवार मतदारसंघात काम करीत आहेत असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री ना राजेश टोपे यांनी केले. ते कर्जत येथे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.
यावेळी बोलताना आ रोहित पवार म्हणाले की, मतदारसंघात उत्तम आरोग्य सेवा देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. अनेक कुटुंबाची जमापुंजी या आरोग्यप्रश्नी खर्च होत असल्याचे अनेक उदाहरणे पहावयास मिळत होते. ते थांबविण्यासाठी आपण उत्तम आरोग्य सेवा, रुग्णसेवेसाठी प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी उपलब्ध करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. कोरोना काळात मतदारसंघातील वैद्यकीय सेवा यांनी ऊत्तम काम केले. अनेक रुग्णाना जीवदान मिळू शकले याचे समाधान आहे. मतदारसंघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रलंबित असणारे प्रश्न, आवश्यक असणारी साधनसामुग्री, उपकरणे तात्काळ उपलब्ध केल्याने गरजवंत रुग्णाना मोठा आधार मिळाला. ८० हजार रुग्णाना फिरत्या दवाखान्याचा लाभ देण्याचे काम करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नर्सेस, आरोग्यसेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता ही कामे केली. ही रुग्णसेवा कौतुकास्पद आहे.